शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

GOOD NEWS: मान्सून गोव्यात दाखल

By admin | Updated: June 8, 2017 17:18 IST

पावसाची आतुरतेने वाट पाहणा-यांसाठी खुशखबर असून काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 8- गेल्या अनेक दिवसांपासून सगळेच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या आहेत पण त्यामध्ये लोकांचं समाधान होत नाहीये. पण आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे.  राज्यात बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने  जोरदार हजेरी लावल्यानंतर गुरुवारीसुद्धा पाऊस सुरू आहे. मान्सून  8 जून रोजी गोव्यात दाखल होइल, असा अंदाज स्कायमॅटने वर्तवला होता. स्कायमॅटचा हा अंदाज खरा ठरला आहे.  8 जूनचा मुहूर्त साधत मान्सूनने गोव्यात हजेरी लावली आहे. 
 
खरंतर सर्वसाधारण वेळापत्रकानुसार मान्सून गोवामार्गे सात जून रोजी महाराष्ट्रात दाखल होतो. पण, अनेकदा अनुकूल परिस्थितीअभावी ही तारीख पुढे मागे होते. यंदाही ही तारीख  पुढे गेली आहे. बुधवारी मान्सून अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, केरळ, तामिळनाडूचा उर्वरित भाग, कर्नाटकच्या किनारी भागाकडील बहुतांश भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडील काही भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला.
 
पुढील तीन ते चार दिवसात मान्सून संपूर्ण गोवा, अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
 
बुधवारी  राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडा, कोकणात पावसाचा जोर अधिक होता. पुढील दोन दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी  पावसाची शक्यता आहे. पुण्यात गुरूवारी काही भागात दुपारी किंवा संध्याकाळपर्यत पावसाची शक्यता आहे.