शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी, आता चातुर्मासातही बिनधास्त करा लग्न!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 21, 2023 11:36 IST

पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ तिथी

छत्रपती संभाजीनगर : यंदा लग्नतिथी कमी असली, तरी चिंता करू नका... कारण अधिकमास- चातुर्मास काळातही लग्न करता येणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान आपत्कालीन ३७ लग्नतिथी पंचांगकर्त्यांनी दिल्या आहेत. मग उडू द्या लग्नाचा बार...  

गौणकाल आणि आपत्कालीन मुहूर्तएप्रिल : १५, २३, २४, २९, ३०.जून : ३०,जुलै : १, २, ४, ५, ९, १०, ११, १४.ऑगस्ट : २२, २६, २८,२९.सप्टेंबर : ३, ६, ७, ८, १७, २४, २६.ऑक्टोबर : १६, २०, २२. २३, २४, २६.नोव्हेंबर : १, ६, १६, १८, २०,२२.अधिक मास : १८ जुलै ते १६ ऑगस्टचातुर्मास : २९ जून ते २३ नोव्हेंबर

मुख्य काळातील लग्नतिथी  मे २०२३ : २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२,२९, २९, ३०.जून : १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २६, २७. २८. डिसेंबर : ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.

पंचांगकर्त्यांचे एकमत : पूर्वी चातुर्मासात (पर्जन्यकाळात) घरासमोर मांडवात विवाह करीत असल्याने आणि प्रवासाची साधने नसल्याने विवाह मुहूर्त दिले जात नव्हते. मात्र, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात मागील ६० ते ७० वर्षांपासून पंचागकर्ते चातुर्मासात विवाह मुहूर्त देत आहेत. आता मंगल कार्यालयात विवाह लावले जातात व प्रवासही सुखकर झाल्याने महाराष्ट्रातही चातुर्मास काळात लग्नतिथी देण्यात याव्यात यावर १८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या सर्व पंचांगकर्त्यांच्या बैठकीत एकमत झाले. 

आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणासाठी ?चातुर्मासात आपत्कालीन विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावायचे आहे किंवा कोणाची नोकरी विदेशात आहे. त्यांना दिवाळीनंतर सुट्या मिळत नाहीत, अशांनी आपत्कालात विवाह करावा, तसेच मुख्य काळात मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही. काही अडचण आली, आपत्कालात विवाह करावा.      - वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी

टॅग्स :marriageलग्न