शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘गुड मॉर्निंग पथकांनी संवेदनशीलता बाळगावी’ : राज्य महिला आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:53 IST

स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी

मुंबई : स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.जिल्हा हागणदारीमुक्त योजनेतील ‘गुड मॉर्निंग’ पथकांच्या अतिउत्साही कारभारामुळे महिलांना विशेषत: गर्भवती महिलांना त्रास होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच उघड्यावर शौचास जाणाºया महिलांचा सत्कार केल्याचा प्रकार समोर आला. याबाबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सोलापूर जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून दक्षता घेण्याची सूचना केली आहे. स्वच्छता अभियानाचा हेतू चांगला असून अनेक अधिकारी यात चांगले काम करतात. कारवाई करताना आततायीपणा करून महिलेला शरम, लज्जा वाटेल असा प्रकार घडू नये. महिलेचे नाव, फोटो, चित्रण किंवा ओळख उघड होईल असे प्रकार करू नयेत, अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाºयांना दिल्या.सोलापूर जिल्हाधिकाºयांसोबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून स्वच्छता मोहीम, जिल्हा हागणदारीमुक्त अभियान राबविताना काळजी घेण्याचे तसेच महिलांबाबत संवेदनशीलता बाळगण्याचे निर्देशही रहाटकर यांनी दिले आहेत.आज महिलांच्या प्रश्नांवर जनसुनावणीठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवारी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता जनसुनावणी होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीस उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.