शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या हत्येनंतर 'गोल्डन' शर्ट गायब

By admin | Updated: July 18, 2016 12:45 IST

गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या झाल्यानंतर सोन्याच्या शर्टमुळे दत्ता फुगे प्रसिद्धीस आले होते तो 'गोल्डन' शर्ट गायब झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
पिंपरी चिंचवड, दि. 18 - गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या झाल्यानंतर आता या प्रकरणात नवीन पेच पोलिसांसमोर उभा राहिला आहे. ज्या सोन्याच्या शर्टमुळे दत्ता फुगे प्रसिद्धीस आले होते तो 'गोल्डन' शर्ट गायब झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पिंपरीमध्ये  दत्ता फुगे यांच्या मुलाच्या मित्रांनीच 14 जुलै रोजी दगडाने ठेचून त्यांची हत्या केली होती.
 
दत्ता फुगे यांच्या हत्येनंतर पोलीस तपास करत आहे. तपासादरम्यान दत्ता फुगे यांचा सोन्याचा शर्ट गायब झालं असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे दत्ता फुगे यांच्या कुटुंबियांनादेखील या शर्टबद्दल काहीच माहिती नसून तो हरवला आहे हेदेखील माहिती नाही आहे. 
 
पोलिसांनी दत्ता फुगेंचा मुलगा शुभम याच्याकडे चौकशी केली असता सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्सकडे ठेवला होता अशी माहिती दिली आहे. पण शर्ट आपल्याकडे नसल्याचा दावा रांका ज्वेलर्सने केला आहे. त्यामुळे इतका महागडा सोन्याचा शर्ट कोठे आहे ? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. आर्थिक समस्यांमुळे सोन्याचा शर्ट विकला असावा, अशी शक्यता काही स्थानिकांनी वर्तवली आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ९ आरोपींना शनिवारी दुपारी खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सात आरोपींना २१जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 
 
(गोल्डमॅन दत्ता फुगे खुन प्रकरणी सात आरोपींना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी)
 
सोन्याच्या शर्टामुळे चर्चेत आलेल्या ‘गोल्डन मॅन’ दत्तात्रय फुगे (४७, रा. शीतल बाग, भोसरी) यांचा गुरुवारी मध्यरात्री दिघी येथील भारतमातानगरमध्ये निर्घृण खून झाला. त्यांच्या मुलासमोरच धारदार कोयत्याने वार केल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आला. आरोपींपैकी एकाकडे असलेल्या पैशांसाठी फुगे यांनी तगादा लावल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वाढदिवसाचे खोटे निमंत्रण देऊन फुगेंना बोलावून घेण्यात आल्याचेही समोर आले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगे यांचा वक्रतुंड चिटफंड, शुभम फायनान्स या नावाने कर्ज देण्याचा व्यवसाय आहे. यामधून दिघी, भोसरी आदी भागात फुगे यांची ओळख आणि दहशतही वाढली होती. अटक आरोपी फुगे यांना गुंतवणूकदार शोधून देण्याचे काम करीत होते. यातील विशाल पाखरे याने फुगे यांच्याकडून दिड लाख रुपये घेतलेले होते. या पैशांसाठी फुगे यांनी तगादा लावलेला होता. तसेच एक महिन्यापूर्वी आरोपींसोबत त्यांची वादावादी झाली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातूनच खूनाचा कट रचण्यात आला.
 
त्यानुसार, मुख्य आरोपी अतुल मोहिते याने शुभमच्या मोबाईलवर फोन करुन त्याच्या वडिलांना मित्राच्या वाढदिवसासाठी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार शुभमने फुगे यांना फोन केला. परंतु त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याने आईला फोन करुन निरोप दिला. त्यांच्याकडून निरोप मिळाल्यावर फुगे यांनी शुभमला फोन करुन बिर्याणी आणि खाद्यपदार्थ घेऊन वाढदिवसाच्या ठिकाणी येण्यास सांगितले. फुगे त्यांच्या मोटारीमधून अतुल मोहितेच्या घराजवळ पोचले. मोहिते व अन्य आरोपींनी त्यांना गप्पा मारत जवळच असलेल्या ट्रॅव्हल बसच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी सुरुवातीला वार करीत फुगे यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये दोन मोठे दगड घालून खून केला. हा प्रकार सुरू असतानाच फुगे यांचा मुलगा शुभम बिर्याणी घेऊन घटनास्थळी पोचला. स्वत:च्या डोळ्यासमोरच वडीलांचा होणारा खून पाहून तो जागीच थबकला. आरडाओरडा करीत त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली.