शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
3
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
4
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
5
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
6
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
7
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
8
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
9
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
10
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
11
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
12
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
13
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
14
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
15
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
16
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
17
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
18
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
19
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
20
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....

चिमुकल्याच्या घशातून काढले सोन्याचे पान

By admin | Updated: October 29, 2016 02:59 IST

नऊ महिन्यांचा चिमुकला रडता-रडता अचानक उलट्या करू लागल्यामुळे घरचे घाबरले. उलट्या न थांबल्यामुळे गुरुवारी रात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. यावेळी तपासणीत घशात

मुंबई : नऊ महिन्यांचा चिमुकला रडता-रडता अचानक उलट्या करू लागल्यामुळे घरचे घाबरले. उलट्या न थांबल्यामुळे गुरुवारी रात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. यावेळी तपासणीत घशात काहीतरी अडकल्याचे निदान झाले. शुक्रवारी सकाळी एण्डोस्कोपी करून गळ््यात अडकलेले सोन्याचे पान काढण्यात डॉक्टरांना यश आले. ९ महिन्यांच्या बाळाच्या घशात अशा प्रकारे वस्तू अडकणे ही दुर्मीळ घटना असून शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आयुष सरोज असे या चिमुरड्याचे नाव आहे. तो गुरुवारी सायंकाळपासून रडत होता. रात्री त्याला उलट्या सुरू झाल्या. घरगुती उपचार करुनही आयुषला बरे वाटत नसल्याने रात्री १ वाजता त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या तपासण्या सुरू केल्या. यावेळी एक्स-रे मध्ये गळ्यात काही तरी बाहेरील घटक असल्याचे निदान झाले. शुक्रवारी सकाळी आयुषवर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कूपर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशळ यांनी दिली.दोन वर्षांची मुले फिरायला लागल्यानंतर अशा गोष्टी तोंडात घालायला शिकतात. अनेकदा त्यांच्या गळ्यात या वस्तू अडकतात. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे तुलनेने सोपे असते. पण, नऊ महिन्यांचे मूल खूप लहान असते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहून गळ्यात अडकलेले पान काढण्यात यश आले. अर्ध्या तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. आता आयुषची प्रकृती स्थिर आहे. त्याला कोणताही त्रास होत नाही. पण, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, असे डॉ. शशिकांत यांनी सांगितले. कूपर रुग्णालयात एण्डोस्कोपीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केल्या जातात. या तंत्रज्ञानाचा अनेकांना उपयोग होत असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पालकांनी घ्या विशेष काळजी! लहान मुले घरात असणाऱ्या पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातील वस्तू जागच्या जागी ठेवणे, लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे. विषारी अथवा टोकदार वस्तू गळ्यात अडकल्यास गुंतागुंत वाढू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.