ठेवणीतल्या सोन्याच्या दागिन्यांनी विठ्ठल रुक्मिणीला झळाळी
By Admin | Published: July 26, 2016 01:59 PM2016-07-26T13:59:37+5:302016-07-26T14:11:22+5:30
यात्रा संपल्यानंतर आजच्या शुभमुहुर्तावर विठ्ठल-रुक्मिणी देवाची प्रक्षाळपूजा मांडण्यात आली होती.
>दीपक होमकर :पंढरपूर
आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांना 24 तास दर्शन देण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीचे नित्योपचार गेल्या 21 दिवसांपासून बंद करण्यात आले होते. यात्रा संपल्यानंतर आजच्या शुभमुहुर्तावर विठ्ठल-रुक्मिणी देवाची प्रक्षाळपूजा मांडण्यात आली होती. त्यानंतर देवाला ठेवणीतली सोन्याच्या दागिण्यांनी मडविण्यात आली त्यामुळे देवाचे रुप अतिशय लोभसवाणे झाले होते.
आज प्रक्षाळपुजेच्या निमित्ताने शेकडो भाविकांनी पहाटेपासूनच विठ्ठलाच्या पायाला लिंबू पाण्याने घासून देवाचा शिनवटा घालविण्याचा प्रयत्न केला. दुपारा बाराच्या सुमारास पहिली देवाला गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रभारी कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते देवाला दुधाने व पंचामृताने अभिषेक करण्यात आल. सुमारे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही पूजा चालली. त्याानंतर विठ्ठलाला सोन्याच्या मुकुटापासून तेे विविधा हिरे-माणिकांच्या दाग दागिन्यांनी सजविण्यात आले. दोन्ही कानांना सोन्याची मासळी लावल्यानंतर विठ्ठलाचे तेज आणखी तेजस्वी झाले. विठ्ठला-रुक्मिणीच्या मुर्तीबरोबर अवघा गाभारा, चार खांबी आणि सोळखांबी सभागृहही फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी धुपारतीच्या वेळी मंदिरातील वातावरण अतिशय प्रसंन्न झाले आणि भाविक त्या वातारवणात हरवून गेले.
आज पासून देवाची शेजारती
आषाढी यात्रेत देवाची शेजारती करून देवाला झोपविण्याचा विधी बंद करण्यात आला होता. त्यामुळे देवाच्या शयनकक्षातील पलंगही काढून ठेवण्यात आला होता. आज प्रक्षाळपूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या पलंगाची विधीवत पुजा करून शयनकक्षाची साफसफाई करुन तो पुन्हा एकदा मांडण्यात आला. रात्री दर्शन बारी संपल्यानंतर देवाची शेजारती झाल्यावर देवाच्या निद्रेचा विधी आज करण्यात येणार असून आषाढीच्या निमित्त तब्बल 21 दिवस अखंड उभे असलेले विठ्ठल रुक्मिणी आजपासून विश्रांती घेणार आहे.