शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील गोल्ड गणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 21:15 IST

खामगावमध्ये गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली असून, विविध रुपातील गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.

गिरीश राऊत, ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 8 - खामगावमध्ये गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली असून, विविध रुपातील गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. तर शहरातील राणा मंडळाचा गणपती पश्चिम विदर्भात श्रीमंत गणपती म्हणून ठरत आहे. या मंडळाचे मूर्तीवर ७० किलो चांदी व साडेतीन किलो सोन्याचे आभुषण चढविण्यात आलेले आहेत. ही मूर्ती पाहण्यासाठी यावषीर्ही भाविकांची गर्दी होत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली असून अनेक मंडळांनी आकर्षक गणेशमूर्तींची स्थापना केली आहे.

तर येथील राणा मंडळांचा गणपती सुद्धा भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. येथील राणा गणेश मंडळाने सन २००३ मध्ये स्थापनेसाठी नगर येथून श्री गणेश मूर्ती आणली होती. विलोभनीय असे रुप असलेल्या गणेशमूतीर्चे भाविकांच्या विनंतीवरुन विसर्जन न करण्याचा निर्णय मंडळ पदाधिकारी यांनी घेतला. तेव्हापासून दरवर्षी याच मूर्तिची स्थापना केली जाते. हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांना श्रद्धा असल्याने भाविकांकडून या गणेशमूतीर्ला सोने व चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे.

आजरोजी या गणेशमूर्ती ७० किलो चांदी व साडेतीन किलो सोन्याच्या आभुषणांनी सजली आहे. यामध्ये चांदीपासून हात, पाय, कान, मुकुट व छत्र बनविण्यात आलेले आहे. तसेच चांदीचे आकर्षक सिंहासन, ४ किलो चांदीचा मूषक, हत्ती बनविण्यात आलेला आहे. तर सोंडेवरील आभुषण, कानातील बाळ्या, मुकुटातील नक्षी, दात, हार सोन्यापासून बनविण्यात आलेला आहे. यासाठी सुमारे साडेतीन किलो सोने वापरण्यात आलेले आहे.

अनंत चतुर्दशीला या गणेशमूतीर्चे विसर्जन न करता ही गणेशमूर्ती शहरातील फरशी भागात स्थापन करण्यात येते. दर संकष्ट चतुथीर्ला सत्यनारायण पूजन व इतर कार्यक्रम सुध्दा पार पडतात. एकूणच वेगवेगळ्या स्वरुपात गणेश मूर्ती स्थापन होत असताना खामगावातील ही गोल्ड गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत असून दूरवरुन भाविक दर्शनासाठी येत आहेत.