शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

आंतरराष्ट्रीय फोटो हंटर्स स्पर्धेत ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी मिळविले सुवर्ण व रजत पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 16:27 IST

फोटो हंटर्स असोसिएशननकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजत पदक प्राप्त केले.

ठळक मुद्दे पत्रकारिता गटात एकूण ५८ स्पर्धकांचा सहभागएकूण २२ देशांमधील २०० छायाचित्रकारांनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला पीएसएच्या प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदकाचे मानकरी भारतातून खरोटे हे एकमेव आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’

नाशिक : फोटो हंटर्स असोसिएशननकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजत पदक प्राप्त केले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफिक सोसायटी आॅफ अमेरिका (पीएसअ‍े) आणि इंटरनॅशनल युनियन आॅफ फोटोग्राफर्स, चीन (आययुपी)च्या संयुक्त विद्यमाने कोलकाता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फोटो हंटर्स स्पर्धेत एकूण २२ देशांमधील २०० छायाचित्रकारांनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी भारतातून एकूण १०५ स्पर्धक होते तर पत्रकारिता गटात एकूण ५८ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यामध्ये २१ छायाचित्रे बक्षीसपात्र ठरली. या गटात पीएसएच्या प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदकाचे मानकरी भारतातून खरोटे हे एकमेव ठरल्याची माहिती स्पर्धेचे अध्यक्ष अभिजित बॅनर्जी यांनी दिली. मागील तीन वर्षांपासून कोलकाता शहरात ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी खरोटे यांनी गरीब-श्रीमंतीमधील विरोधाभास आपल्या छायाचित्रातून टिपला होता. त्यामध्ये एका मोठ्या गृहप्रकल्पाच्या जाहिरातीच्या होर्डिंग्जवर एक तरुणी आरामदायक गादीवर बसून लॅपटॉप हाताळत असल्याचे दाखविण्यात आले होते. याच होर्डिंग्जच्या खाली भुमिगत गटारीच्या ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपवर एक भटका तरुण पांघरुन घेत निद्रीस्त झाल्याचे खरोटे यांनी हेरले आणि त्यामधील विरोधाभास कॅमेºयात ‘क्लिक’ केला. या छायाचित्राने ‘पीएसअ‍े’चे सुवर्णपदक मिळविले. तसेच जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दुष्काळाची दाहकता दर्शविणारे दुसरे छायाचित्र रजत पदकास पात्र ठरले. या छायाचित्रामध्ये खरोटे यांनी दोन आदिवासी महिला एका पडक्या विहिरीत गाळामध्ये साचलेल्या डबक्यातून लाकडी शिडी लावून डोक्यावर पाण्याचे हंडे घेत वर येत असल्याचे स्थिती टिपली होती.

सदर दोन्ही छायाचित्रांना ‘लोकमत’ने नाशिक आवृत्तीमध्ये प्रसिध्दी दिली होती. फोटोग्राफिक सोसायटी आॅफ अमेरिका जगाच्या सर्वात मोठी संघटना आहे.