शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ दूध दरवाढीचा संघर्ष पेटला, गायीच्या दुधास अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:16 IST

जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गायीच्या दुधास दोन रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गायीच्या दुधास दोन रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चास आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील सत्तारूढ गटाने विराट प्रतिमोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले.‘गोकुळ’ हा देशात नावाजलेला दूध संघ आहे़ अशा संस्थेची बदनामी यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला. राज्य शासनाने गायीच्या दुधास लीटरमागे प्रत्येकी पाच रुपयांचे अनुदान थेट उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली व तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.गेल्या आठवड्यात आमदार पाटील यांनी मोर्चा काढून ‘गोकुळ’च्या कारभारावर व संचालकांच्या उधळपट्टीवर टीकेची झोड उठविली होती. या संस्थेचा वापर महाडिक यांच्या खासगी मालमत्तेसारखा होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तो जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेऊन हा निषेध मोर्चा व जागृती मेळावा काढला. त्यामध्ये महिलांसह गावोगावचे उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘महाडिक व पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकारणात ‘गोकुळ’चे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. चांगली संस्था राजकीय आरोप-प्रत्यारोप करून बदनाम होणार नाही याची दक्षता घ्या.’हा मोर्चा संपल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक यांच्या २३ टँकरची यादीच जाहीर केली. हे आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांचे टँकर आहेत, असे खासदार महाडिक सांगत असतील तर मग४५ लाखांचा टँकर घेणारे हे कोण गरीब कार्यकर्ते आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हानही पाटील यांनी दिले.महादेवराव महाडिक म्हणाले, गोकुळ हे महाडिक कुटुंबांचे शक्तिस्थान आहे़ त्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहू लागले तर उत्पादकच त्यांना पुरून उरतीलक़ोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील सत्तारूढ गटातर्फे गुरुवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले.