शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीने गाठली धोक्याची पातळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:02 IST

नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. गोदावरीला पूर आल्याने जायकवाडी धरणातही हळूहळू नवीन पाण्याची आवक होत आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा, मुळा नद्यांना पूर आला आहे. नाशिकला सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना इशारानाशिक जिल्ह्याच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्प क्षेत्र तसेच औरंगाबाद जिल्हा व जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास पाणी येऊन धडकले. पाण्याची गती पाहता रात्रीतून ते जायकवाडीत पोहोचेल.भीमाच्या विसर्गात दुपटीने वाढ : अहमदनगर जिल्ह्यांतून जाणाऱ्या गोदावरी, भीमा, मुळा नद्यांचा विसर्ग दुपटीने वाढला आहे. भंडारदरा धरण भरत आले आहे. मुळा धरणातही जोरदार आवक सुरू आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील बंदी झुगारलीपुणे जिल्ह्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मागील ३५ वर्षांत एकाही पर्यटकाचा अपघात झालेला नसताना पोलीस प्रशासन पर्यटकांची अडवणूक का करीत आहे, असे आकांडतांडव करत रविवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी प्रवेश मोकळा करून दिला. बंदी झुगारून ते पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर घेऊन गेले. बंदीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रात विश्रांतीकोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली; त्यामुळे पंचगंगानदीच्या पुराच्या पातळीत घट होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगलीत पावसाने विश्रांती घेतली आहे.‘सेल्फी’ने तरुणाचा बळीचाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील पाटणादेवी धबधब्याजवळील कुंडावर सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने योगेश्वर राजेश्वर भोरे (२३, रा. कुंडलवाडी, जि.नांदेड) याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.