शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीला पूर; दुतोंड्या मारूती बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:43 IST

गंगापूर धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे पाच वाजता गोदावरीला पूर आला. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे चित्र होते.

आॅनलाइन लोकमत / नाशिक : गंगापूर धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे पाच वाजता गोदावरीला पूर आला. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे चित्र होते. दोन पूल वगळता सर्व पूल पाण्याखाली गेले आहे. गाडगे महाराज पूलावर पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी पाच वाजता गंगापूर धरणातून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. रविवारी सकाळी गंगापूर धरणातून साडेआठ वाजेपासून दहा हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दुपारी तीन वाजेपासून धरणसमुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातून चार वाजेपासून विसर्ग वाढविण्यास सुरूवात झाली. साडे पाच वाजेपर्यंत चार हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. शहरात होणारा पाऊस त्यामुळे गोदापात्रात जाणारे पाणी आणि धरणाचा विसर्ग लक्षात घेता अहल्यादेवी होळकर पूलाखालून पाच वाजेपासून पुढे सतरा हजार क्युसेक इतक्या पाणी प्रवाहित झाले होते. यामुळे गोदावरीला पूर आला. गोदाकाठावरील मोठे मंदिरे वगळता सर्व मंदिरे बुडाली होती. नारोशंकर मंदिर देखील निम्म्याहून अधिक बुडाल्याचे चित्र संध्याकाळी पहावयास मिळाले. तीन तासांत वाढली दुप्पट पातळीहोळकर पूलावरून पुढे ९ हजार ४७० क्यूसेक पाणी गोदापात्रात दुपारपर्यंत प्रवाहित झाले होते. दुतोंड्या मारूतीच्या छातीच्या वरपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र संध्याकाळी पाच वाजेपासून नदीच्या पातळीत सुमारे दुपटीने वाढ होऊन सतरा हजार क्युसेकपर्यंत पाणी होळकर पूलाखालून प्रवाहित झाले होते. त्यामुळे दुतोंड्या मारुतीची मुर्तीच्या डोक्यावरून पुराचे पाणी वाहू लागले होते.

 

गोदावरीच्या परिसरातील नागरिकांना गोवर्धन, गंगापूर गावापासून तर थेट नाशिक शहरमार्गे टाकळी, दसकपर्यंत सावधानतेबरोबरच धोक्याचा इशारा आपत्ती व अग्निशामक विभागाकडून दिला जात आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून गोदाकाठालगत गस्त घातली जात आहे. शहरातील रामकुंड ते तपोवन परिसरात नाशिककरांबरोबरच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील जास्त असते. रविवारची सुटी असल्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर पंचवटी अग्निशामक उपकेंद्र, पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील रामकुंड, तपोवन परिसरात तैनात करण्यात आले आहे.-

 

संडे टुरिझम अ‍ॅट गोदाकाठगोदावरीचे सर्व लहान पुल पाण्याखाली गेले आहे. पूर बघण्यासाठी संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल, अहल्यादेवी होळकर पूल, लक्ष्मीनारायण पूल परिसरात नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारची सुटी असल्याने नाशिककर पूर बघण्यासाठी कुटुंबासमवेत सकाळी अक रा वाजेनंतर घराबाहेर पडण्यास सुरूवात झाली. दुपारपासून पूलांवर गर्दी वाढली असून नागरिक पूलावरच वाहने उभी करत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.