शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

गोदावरीला पूरसदृश स्थिती, शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती

By admin | Updated: July 14, 2017 15:38 IST

नाशिक शहर जलमय : दाढेगावचा संपर्क खंडित, सिडकोत भाजीपाला भिजला

लोकमत ऑनलाइन नाशिक, दि. 14 - जुलै महिन्याच्या प्रारंभापासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरला असून, मध्यरात्री कोसळधार बरसणाऱ्या पावसाने शहरातील गोदावरी व नासर्डीसह अन्य नद्यानाल्यांना पाणी वाढले असून, पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागांत पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीत गोदापात्रात एक मुलगा वाहून गेल्याची भीती असून, त्याचा शोध सुरू आहे. पंचवटीत रामकुंडावर पूरसदृश स्थिती, वाहून गेलेल्या मुलाचा शोध

पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, नदीपात्रात उभ्या असलेल्या दुतोंड्या मारोतीच्या कमरेपर्यंत पाणी साचले आहे. गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदाकाठी दशक्रिया विधीसाठी सकाळीच आलेल्या नागरिकांचे हाल झाले. वस्त्रांतरगृह आणि अन्य धर्मशाळांमध्ये हे विधी पार पडले. सकाळी रामकुंड परिसरात उभी असलेली मोटार नदीत वाहून गेली. तथापि, नागरिकांनी परिश्रमपूर्वक ती कार अडवली. पंचवटीत मोरे मळा परिसरात एका नाल्यात परिसरातील दहा ते बारा वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या वतीने या मुलाची शोध मोहीम सुरू आहे. पंचवटी विभागीय कार्यालयासमोरील मखमलाबाद येथे एक कडुनिंबाचे झाड दोन मोटारींवर पडल्याने या मोटारींचे नुकसान झाले. काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महापालिकेच्या वतीने ध्वनीक्षेपकावरून सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. सातपूर साचलेल्या पाण्यावर आंदोलन

मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाळे सातपूर परिसरात जागोजागी पाणी तुंबले आहे. पपया नर्सरी चौक, सातपूर विभागीय कार्यालय, एमआयडीसीतील बॉश कंपनीसमोर, आयटीआय सिग्नल, आयटीआय पूल आदि भागात पाणी साचले आहे. रहदारीस अडथळा निर्माण झाला असून ट्रॅफिक जाम झाली आहे. महापालिकेने नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण न केल्याने पाणी साचल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने साचलेल्या पाण्यात ट्युब टाकून जलतरण करीत महापालिकेतील भाजपाचा निषेध करण्यात आला. पावसामुळे सोमेश्वर येथे दूधसागर धबधबा वाहू लागला असून, तो पाहण्यासाठी भरपावसात तरुणाईची झुंबड उडाली आहे. सिडकोत भाजीविक्रेत्यांचे नुकसानबडदेनगर, गणेशचौक, साईबाबा चौक, लेखानगर आदि मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पवनगर, उत्तमनगर, उपेंद्रनगर, त्रिमूर्तीचौक आदि ठिकाणच्या भाजीविक्रेत्यांनी रात्री आणून ठेवलेला भाजीपाला भिजल्याने मोठे नुकसान झाले. भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही तारांबळ उडाली. तानाजी चौक, बाजीप्रभू चौक येथे तातडीने नालेसफाई केल्याने घरात पाणी घुसण्याचा धोका टळला. नाशिकरोडला नद्यांमध्ये वाढले पाणी रात्रभरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे गोदावरी, वालदेवी, दारणा नद्या दुथडी भरून वाहत आहे. नाशिकरोड परिसरातील बहुतांशी भाजीमंडईतील दुकाने बंद असून, शुकशुकाट आहे. पावसामुळे हमरस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जागोजागी पाण्याचे पाट वाहत आहे. भीमनगर परिसरातील मनपा कार्यालयाच्या परिसरात एक झाड उन्मळून पडले. मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. शहरातील नाशिक-पुणे रोडवर पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने जात आहे. शिवाजीवाडीतून स्थलांतराच्या सूचना नासर्डी नदी दुथडा भरून वाहत आहे. शिवाजीवाडी परिसरात नदीकाठच्या नागरिकांना तातडीने जागा रिकाम्या करून स्थलांतराची सूचना केली आहेत. नाशिक पूर्व विभातील धोकादायक काझी गढीवरील काही नागरिकांनी जागा सोडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गढीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे या पावसाळ्यातही धोकाकायम आहे. दाढेगावशी संपर्क तुटलासंततधार पावसामुळे देवळालीकॅम्पमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सकाळपासून पाऊस न थांबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे दाढेगावचा पाथर्डी गावाशी असलेला संपर्क तुटला आहे.