- ऑनलाइन लोकमत
वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार
माजलगाव, दि. ५ - शहरातील मंजरथ रोड वरील दत्त कॉलनी विभागात विजवितण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज वाहक करणारी मुख्य तार घरासमोर खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलीच्या अंगावर पडली. सदरील मुलगी गंभीर रित्या जखमी झाली यातुन मुलीचे दैव बलवत्तर होते म्हणून ती वाचली. शहरातील बहुतांश भागात वीज वाहक तारा या जीर्ण झाल्या आहेत.
गणपतीच्या आगमनाची तयारी होत असताना अचानक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरावरील वीज वाहक करणारी मेंन लाईटची तार श्रद्धा संतोष शिंदे या पाचवी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर पडली. यामुळे मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. दत्त कॉलनी मध्ये अनेक ठिकाणी विद्यूत तारांना जोड देऊन बसवण्यात आलेल्या आहेत.
त्यातूनच आज या मुलीच्या अंगावर हि जोड दिलेली तार पडली. सदरील शाळकरी मुलीचे दैव बलवत्तर म्हणून हि मुलगी अंगावर मुख्य तार पडून सुद्धा केवळ गंभीर रित्या जखमी झाली. तारेने मुलीला लवकर सोडल्याने मोठा होणारा अनर्थ टळला. श्रद्धा शिंदे वर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्य असलेल्या 3 मेन लाईनपैकी 2 तारा या मुलीच्या अंगावर पडल्या यात तिच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यावर आणि चेहऱ्यावर जखमा झालेल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मुलीचा जीव जाता जाता राहिला. या आधी सुद्धा अशा घटना होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे पण गेंड्याची कातडी पांघरलेले या वीज वितरण कंपनीला आणखी किती जीव गेल्या नंतर जाग येणार असा प्रश्न शहरवासीय उपस्तीत करीत आहेत.
वीज वितरण कंपनी बळी गेल्यावरच जागी होणार का
शहरातील अनेक ठिकाणी अश्या जोड दिलेल्या तारा ठळक डोळ्यासमोर दिसून येतात,काही ठिकाणी तर अक्षरशः घरांमधून वीज वितरण ची तार गेलेल्या आहेत सदरील ठिकाणी नागरिकांना जाताना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागते अशी परिस्तिथी असताना अनेकांच्या जीवांना धोका आहे आगामी काळात जर अशी घटना घडली तर आश्चर्य वाटायला नको कारण जीव गेल्या शिवाय वीज वितरण कंपनीला जग येणार नाही असे बोलले जात आहे.
मुख्य रस्त्यावरही हीच बोंब
शहरातील एकमेव असणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुमारे 100 रावर वीज वितरणाचे खांब आहेत ते सुद्धा अर्ध्या रस्त्यात च आहेत यातून गेल्या काही महिन्यापूर्वी ऐन शिवाजी चोकात एक दुचाकी गाडी वीज वाहक करणारी तार पडून भस्म झाली संपूर्ण तारी या जीर्ण झालेल्या असून रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांत हि एकप्रकारे मनात जीवाची भीती घेऊनच चालावे लागते..