शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘देवा’ विरुद्ध ‘टायगर जिंदा है’ : मल्टिप्लेक्सविरुद्ध मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:50 IST

मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी मराठी विरुद्ध हिंदी वाद मुंबईत पुन्हा पेटताना दिसत आहे. येत्या शुक्रवारी (दि.२२) ‘देवा’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर यशराजचा ‘टायगर जिंदा है’देखील धडकतोय. या वेळी ‘टायगर जिंदा है’साठी मल्टिप्लेक्सने प्राइम टाइम दिल्याने ‘देवा’लाही प्राइम टाइम द्या, अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.

मुंबई : मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी मराठी विरुद्ध हिंदी वाद मुंबईत पुन्हा पेटताना दिसत आहे. येत्या शुक्रवारी (दि.२२) ‘देवा’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर यशराजचा ‘टायगर जिंदा है’देखील धडकतोय. या वेळी ‘टायगर जिंदा है’साठी मल्टिप्लेक्सने प्राइम टाइम दिल्याने ‘देवा’लाही प्राइम टाइम द्या, अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.‘देवा’देखील धुमधडाक्यात प्रदर्शित करण्याचा आम्ही ठाम निर्धार केला आहे; परंतु यदाकदाचित तसे झाले नाही, तर यशराज फिल्म्सच्या शूटिंग महाराष्ट्रात होत असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन थिएटर्सनीही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.२२ डिसेंबर रोजी यशराज फिल्म्सचा अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी ‘देवा’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. मात्र, ‘देवा’ला प्रदर्शनासाठी स्क्रीन्स उपलब्ध होत नसल्याने वातावरण तापत चालले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मल्टिप्लेक्सवाल्यांकडे भीक मागावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदी चित्रपटांकडून थिएटर मालकांकडे स्क्रीन्स मिळविण्यासाठी दादागिरी केली जात आहे. महाराष्ट्रात हा माज वास्तविक मराठी चित्रपटांनी करायला हवा. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी आंदोलने करावी लागतात हे दुर्दैव आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला आमचा विरोध नाही, तर यशराज फिल्म्सच्या मुजोरपणाला, दादागिरीला विरोध आहे. आम्ही त्यांना याबाबत एक पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, असेही अमेय खोपकर यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, ‘देवा’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरीने, ‘आम्हाला वाद नकोत; ‘टायगर जिंदा है’ चित्रपट पण चालू दे आणि माझा ‘देवा’ पण चालू दे एवढीच आमची इच्छा आहे,’ अशी भूमिका या एकूणच प्रकरणावर मांडली आहे.अवस्था फेरीवाल्यांसारखी - राऊत‘देवा’ विरुद्ध ‘टायगर जिंदा है’वाद पेटत असताना, त्यात आता शिवसेनेदेखील उडी घेतली आहे. ‘देवा’च काय प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे. मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.कारवाई का नाही?महाराष्टÑ सरकारने मल्टिप्लेक्सना मराठी चित्रपटांच्या स्क्रीनिंगचे आदेश दिले असतानाही थिएटर मालक आदेशाचे उल्लंघन करतात. आदेश असतानाही मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स नाकारणाºया थिएटर्सवर कारवाई का होत नाही?- नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेतेस्वाभिमान पाहिजेच!महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ला मारून ‘टायगर जिंदा’ राहत असेल, तर थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही!- नीतेश राणे, आमदार

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाDevaदेवाTiger Zinda Haiटायगर जिंदा है