शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘झुमे जा, ओ बेपरवाह...!’

By admin | Updated: July 13, 2017 04:52 IST

‘तो’ येणार म्हणून प्रेक्षक जणू डोळ्यात प्राण आणून बसले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तो’ येणार म्हणून प्रेक्षक जणू डोळ्यात प्राण आणून बसले होते... वाद्यांचा गजर चौफेर निनादत होता... काहींची नजर ‘त्याला’ मंचावर शोधत होती, तर ‘तो’ कदाचित थेट प्रेक्षकांमधून ‘उगवेल’ म्हणून काहींच्या नजरा सारख्या मागे वळत होत्या. मधेच वाद्यांचा आवाज वाढायचा आणि ‘तो’ आलाय की काय म्हणून हृदयाची स्पंदनेही... अखेर निवेदिकेने काऊंटडाऊनचा इशारा केला... झगमगणाऱ्या दिव्यांनी चकाकणारे स्टेडियम अचानक गुडूप अंधारात बुडाले... मोबाइलच्या टॉर्चच्या असंख्य काजव्यांनी एक शुभ्र चादर पसरली... आणि जणू या काजव्यांना आपल्या श्वेत वस्त्रात गुंडाळून ‘तो’ अखेर मंचावर आला... अन् ‘टायगर-टायगर’चा एकच गलका झाला... लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि तरुणींची ‘दिल की धडकन’ असलेला टायगर श्रॉफ अगदी ‘झुमके’ नाचला आणि प्रेक्षकांनीही ‘बेपर्वा’ होत त्याला बेफाम प्रतिसाद दिला.‘लोकमत’ आणि ‘प्रीती आयआयटी पिनॅकल’तर्फे जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिनानिमित्त आणि ‘मुन्ना मायकेल’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात हा शानदार कार्यक्रम पार पडला. ‘एक्झॉटिक लव्ह साँग’ची भरमार असलेल्या ‘मुन्ना मायकेल’ या स्टंट आणि डान्सपटात निधी अग्रवाल ही टायगरची नायिका आहे. तिनेही टायगरसोबत या कार्यक्रमात येऊन ‘चार चाँद’ लावले. दोघांनीही मंचावर आल्या-आल्याच ‘दिल हैं आवारा तो ऐतराज क्यो हैं...’ या गाण्यावर ताल धरला आणि त्यांचा अपार उत्साह बघत नागपूरकरांचीही पावले त्यांच्याही नकळत थिरकायला लागली. या गाण्याच्या लाँचिंगचा मानच मुळात नागपूरला मिळाला.यानंतरच्या डान्सने तर नुसता ‘कहर’ गेला. सध्या तरुणाईत अफाट लोकप्रिय असलेल्या ‘मेरी वाली डिंग, डांग, डिंग, डांग, डिंग, डांग, डिंग, डांग, करती हैं...’ या गाण्यावर टायगर-निधीसोबत अख्खे स्टेडियम नाचायला लागले. या कार्यक्रमाचे तिसरे आकर्षण होते शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन. वडिलांसारखीच ‘एनर्जी’ लाभलेल्या या प्रतिभावंत गायकाने आपल्या दमदार आवाजात ‘दिल हैं आवारा तो ऐतराज क्यो हैं...’ हे गाणे सादर केले. यावेळी एका छोटेखानी मुलाखतीत टायगर व निधीने त्यांच्या बॉलिवूड प्रवासाचे अनेक किस्से शेअर केले. या रंगारंग कार्यक्रमात स्थानिक कलावंतांच्या गु्रपनेही सुंदर सादरीकरण केले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, इन्ट्रिया ज्वेलर्सच्या संचालिका पूर्वा कोठारी, या कार्यक्रमाचे प्रायोजक अग्रवाल स्टडी सेंटर प्रा.लि.चे संचालक जगदीश अग्रवाल व प्रीती अग्रवाल, पिकर आॅनलाईनचे संचालक मनोज झारिया व लीना झारिया, मोदी लेन्स मॉल प्रा.लि.च्या प्रज्ञा मोदी, उमंग ग्रुपच्या (उमंग गीताई गर्ल्स कॉलेज) संचालिका वैशाली फुले, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे आरती बोदड यांच्या हस्ते जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपीय टप्प्यात अग्रवाल स्टडी सेंटरच्या गुणवंत विद्यार्थ्यांना टायगर-निधीच्या हस्ते गौरविण्यात आले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी सर्व कलावंत व प्रायोजकांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अप्रतिम निवदेन अनुजा घाडगे हिने केले. या कार्यक्रमात सहभागी सर्व डान्स ग्रुपच्या एकित्रत फ्लॅश मॉबने कार्यक्रमाचा रंगतदार समारोप झाला. ‘लोकमत’ आणि ‘प्रीती आयआयटी पिनॅकल’चे आयोजनसिद्धार्थ महादेवनच्या गीताने दणाणले स्टेडियम>टायगरची ‘पॉवरफुल्ल’ हीरोपंतीडान्सचा बादशहा मायकल जॅक्सनला ‘लोकमत’ आणि ‘प्रीती आयआयटी पिनॅकल’तर्फे आयोजित कार्यक्रमात अनोखी नृत्यांजली वाहण्यात आली. लाखो तरुणींच्या ‘दिल की धडकन’ असलेला टायगर श्रॉफ, अभिनेत्री निधी अग्रवाल यांनी केलेल्या ‘पॉवरफुल्ल’ नृत्यामुळे तरुणाई बेधुंद होऊन थिरकली. टायगरची ‘हटके स्टाईल’, निधीचे सौंदर्य आणि सिद्धार्थ महादेवनचे थेट हृदयाला भिडणारे सूर यांनी नागपूरकरांची मने जिंकली. बुधवारी कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमात कलावंतांनी केलेल्या सादरीकरणामुळे हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीने ‘हाऊसफुल्ल’ झालेले सभागृह नृत्यमय झाले होते.