औरंगाबाद : आर. आर. पाटील फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रस्तुत लोकमत विधिमंडळ पुरस्कार-२०१६च्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना गौरवशाली प्रेरणा मिळणार आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, स्व. पाटील यांच्या कन्या तथा फाऊंडेशनच्या सदस्या स्मिता पाटील यांनी लोकमतचे गौरवशाली सामाजिक योगदान, फाऊंडेशनची स्थापना आणि कार्य यावर प्रकाश टाकला.लोकमतने एवढ्या मोठ्या आणि प्रेरणादायी गौरवशाली पुरस्कारांची मुहूर्तमेढ राज्यात रोवली आहे आणि सोबतीला आर. आर. पाटील फाऊंडेशनला घेतले आहे. हा सुवर्णयोग असून, पुरस्कारप्राप्त विधिमंडळ सदस्याला यातून मोठी प्रेरणा मिळणार आहे. राज्याच्या सामाजिक जडण-घडणीमध्ये लोकमतचा मोठा वाटा असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी नमूद केले. घराणेशाही, स्थानिक स्वराज्य संस्था, हुजरेगिरी करणारे आणि संघर्ष करणारे, असे चार प्रकारचे लोक राजकारणात पुढे येतात. आर. आर. पाटील संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व होते. त्यांनी विधिमंडळात दिलेले योगदान त्यांच्या उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारातून दिसून येते. ग्रामस्वच्छता अभियान, डान्सबार बंदीसारखे अनेक विषय त्यांनी हाताळले. ६० महत्त्वाचे व दूरगामी परिणाम करणारे विषय पाटील यांनी विधिमंडळात मांडले. सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर पाटील नेहमी भावनिकरीत्या बोलायचे. स्व.वसंतदादा पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना प्लॅटफॉर्म दिला.पाटील यांचे साहित्य, अनुभव, २० हजार पानांचा भाषण संग्रह उपलब्ध आहे. हे सर्व तरुणांपुढे येण्यासाठी आणि अनेक आर. आर. पाटील राजकारणात घडविण्यासाठी त्यांच्या नावाच्या प्रेरणेने फाऊंडेशनची स्थापना केली. राज्यात डान्सबार बंदी झालीच पाहिजे, यासाठी फाऊंडेशनने स्वतंत्र वकील लावला. विधानसभेत कायदा करूनही शासन कोर्टात कमी पडले. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पाल्यांना संगणक प्रशिक्षणासाठी औरंगाबादेत केंद्र सुुरू केले. व्यसनमुक्ती आणि शिक्षणावर भर देणे आणि आर. आर. पाटील यांच्या पे्ररणेतून तरुण पिढी राजकारणात, समाजकारणात घडविण्याचे काम फाऊंडेशन यापुढे चालू ठेवणार आहे. (प्रतिनिधी)अभ्यासूपणाचीप्रेरणा मिळेलआबांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव झाला. त्यांनी राज्यात डान्सबार बंदी केली. ग्रामस्वच्छता अभियान आणले. ग्रामविकासाच्या योजना राबविल्या. लोकमतच्या विधिमंडळ पुरस्कारामुळे लोकप्रतिनिधींना अभ्यासूपणे काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असे स्व.पाटील यांच्या कन्या तथा फाऊंडेशनच्या सदस्या स्मिता पाटील म्हणाल्या.
लोकमतच्या विधिमंडळ पुरस्कारातून मिळणार गौरवशाली प्रेरणा
By admin | Updated: August 2, 2016 05:19 IST