शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 08:04 IST

विरोधक केवळ अफवा पसरवीत आहेत, फडणवीसांचा विधानसभेत आरोप

मुंबई - महायुती सरकार ७५ हजार सरकारी नोकऱ्या देणार, असे आम्ही जाहीर केले होते. आतापर्यंत ५७,४०० जणांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत, भरती प्रक्रिया पूर्ण झाली अन् आता कोणत्याही क्षणी नियुक्तीपत्रे दिली जातील, असे १९,८५३ जण आहेत आणि याशिवाय ३१,२०१ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दोन वर्षांत एक लाखांवर नोकऱ्या देण्याचा हा देशातील विक्रम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. 

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मृद व जलसंधारण विभागामार्फत झालेल्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. अपवादात्मक परिस्थितीत तसे घडले असले, तरी संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनेच झालेली आहे. काही लोक खोट्या नॅरेटिव्हद्वारे अफवा पसरवत आहेत. पुण्यात एक वेबसाइट आहे, ती हेच काम करते. असे खोटे पसरविणाऱ्यांविरुद्ध लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. 

गट ‘क’ची पदभरती एमपीएससीमार्फत करणारराज्य सरकारी सेवेतील गट ‘क’ची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यात येतील. त्यासाठी एमपीएससीने अनुमती दिली आहे. राज्य सरकारनेही तसा निर्णय घेतला आहे.सरकारी पदभरती परीक्षेच्या वेळी निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे फडणवीस म्हणाले.

भरती पुन्हा सुरू केलीपाचवा वेतन आयोग दिल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने राज्यात नोकरभरती बंद केलेली होती, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती सुरू करण्यात आली, याची आठवण फडणवीस यांनी विरोधकांना करून दिली. राजेश टोपे, आशिष शेलार, रोहित पवार आदी सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

पेपरफुटीसंदर्भात कायदा याच अधिवेशनातपेपरफुटीला आळा बसण्यासाठी केंद्राने कायदा आणलेला आहे. राज्याचा असा कायदा आणण्याचा मानस गेल्याच अधिवेशनात व्यक्त केलेला होता. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हा कायदा निश्चितपणे आणला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा