शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 06:00 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात गुरुवारी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी राज्य सरकारला दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात गुरुवारी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वाघमारे यांनी दिवाळीनंतर होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतरही कर्मचाऱ्यांची उपलब्धता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगातही काही जागा रिक्त आहेत. एकूण मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत संबंधित विभागांना अवगत करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृहविभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

शासनाचीही तयारीराज्य निवडणूक आयोगाला निवडणुकांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करण्यात येईल. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिली.

प्रभागरचनेचे काम पूर्ण२९ महापालिका, २४६ नगर परिषदा, ४२ नगरपंचायती, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. प्रभागरचनेचे काम झाले आहे. आरक्षण निश्चिती आणि मतदार यादीचा कार्यक्रम देण्यात आला आहे, अशी माहिती आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Provide adequate manpower for local body elections: State Election Commissioner!

Web Summary : State Election Commissioner directs government to prioritize manpower for upcoming local body elections. Reviews readiness for municipal corporations, councils, Zilla Parishads, Panchayat Samitis elections after Diwali. Government assures full support, including manpower and law enforcement. Preparations for ward formation are complete.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024