शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साखरेला किमान ३२०० रुपये किंमत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:04 IST

साखर कारखान्यांकडून विक्री होणाऱ्या साखरेला क्विंटलला किमान ३२०० रुपये निश्चित दर मिळावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्याचा एकमुखी निर्णय सोमवारी मुंबईतील सह्याद्री

कोल्हापूर/ मुंबई : साखर कारखान्यांकडून विक्री होणाऱ्या साखरेला क्विंटलला किमान ३२०० रुपये निश्चित दर मिळावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्याचा एकमुखी निर्णय सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामध्ये साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पुढील आठवड्यांत पंतप्रधानांची भेट घेण्याचा निर्णय झाला. बाजारातील साखरेचा भाव गडगडल्याने महाराष्ट्रात आणि देशातील साखर उद्योगापुढेही अभूतपूर्व पेचप्रसंग तयार झाला आहे. यंदाच्या हंगामातील ‘एफआरपी’ही अजून कित्येक कारखान्यांना देता आलेली नाही. बहुतांशी सर्वच कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेल्याने कर्जाची थकबाकी वाढत आहे. पुढील हंगाम घ्यायचा कसा असा पेच साखर कारखान्यांसमोर आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल याचा विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक झाली. एफआरपी देणे शक्य होईल; परंतु हा निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने पंतप्रधानांनाच भेटून त्यांना साकडे घालण्याचा निर्णय झाला.अन्य मागण्या अशा...बैठकीत इथेनॉलची किंमतही वाढवून देण्याची मागणी झाली. आता ती लिटरला ४० रुपये आहे शिवाय त्यावर १८ टक्के जीएसटी आहे, तो ५ टक्के करावा, साखर निर्यातीसाठी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही अनुदान द्यावे, साखरेवरील जीएसटीतील निम्मा वाटा राज्य सरकारना देऊन त्यातून साखर विकास निधी तयार करा अशा मागण्या झाल्या.राज्यातील साखर उद्योग अडचणींना सामोरे जात आहे. त्यामुळे या उद्योगाला दिलासा देण्याच्यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवरही काही निर्णय कसे तातडीने होतील, असे प्रयत्न केले जातील.- चंद्रकांत पाटील,महसूल मंत्रीसाखरेची किमान विक्री किंमत निश्चित करणारकेंद्र सरकारच्या हालचाली देशांतर्गत बाजारात उतरलेल्या साखरेच्या दरामुळे चिंतेत असलेल्या केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार लवकरच साखर कारखान्यांसाठी किमान विक्री किंमत निश्चित करून देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.