शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या डम्पिंग ग्राउंडसाठी पर्याय द्या! - उच्च न्यायालय

By admin | Updated: October 21, 2015 02:48 IST

पुणे शहरासाठी उरळी देवाची फुरसुंगी हे एकुलते एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते बंद केले, तर शहराची काय अवस्था होईल, याची कल्पना केली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला.

मुंबई : पुणे शहरासाठी उरळी देवाची फुरसुंगी हे एकुलते एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते बंद केले, तर शहराची काय अवस्था होईल, याची कल्पना केली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला. पुणे महापालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी अतिरिक्त किंवा पर्यायी जागा देण्याचा विचार करा, अन्यथा तसे आदेश देऊ, असे न्यायालयाने खडसावले.डम्पिंग ग्राउंडसाठी जागा अपुरी असल्याने अतिरिक्त जागा मिळावी, यासाठी पुणे महापालिकेने २०१०मध्ये सरकारच्या तिजोरीत सुमारे ४ कोटी रुपये जमा केले. मात्र, राज्य सरकारने महापालिकेला पर्यायी किंवा अतिरिक्त जागा दिली नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने याबाबत तत्काळ विचार करावा, अन्यथा पुढील सुनावणीच्या वेळी आम्हीच तसे आदेश देऊ, असे न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने म्हटले. पुणे महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन, २०००मधील नियमांचे पालन किती कालावधीत करणार, हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीच्या वेळी दिले. (प्रतिनिधी)