शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

ठिंबकसाठी १०० टक्के अनुदान देणार - सदाभाऊ खोत

By admin | Updated: July 14, 2016 20:41 IST

ऊस पिकाला जादा पाणी लागत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देऊन जास्तीत जास्त ऊस पिकासाठी ठिंबक सिंचन योजना राबविण्याचे

ऑनलाइन लोकमत

टेंभुर्णी, दि. १४ -  ऊस पिकाला जादा पाणी लागत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देऊन जास्तीत जास्त ऊस पिकासाठी ठिंबक सिंचन योजना राबविण्याचे धोरण आखत आहोत़ यासाठी साखर कारखाने, नाबार्ड व शाासन यांच्या माध्यमातून व चांगल्या कंपन्यामार्फत ठिंबक सिंचनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली़ राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या सदाभाऊ खोत यांनी उजनी टें येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक प्रा़ सुहास पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते़यावेळी त्यांच्यासमवेत विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष दिपक भोसले, जिल्हा संघटक प्रा़ सुहास पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, सातारा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गोपीचंद पडवळकर, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष महावीर सावळे, विजय रणदिवे, एकनाथ सुर्वे, चंद्रकांत गिड्डे, चंद्रकांत कुटे, प्रताप मिसाळ, बळीराम गायकवाड, रूषीकेश बोबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते़ पूर्वीचा शेतकरी नेता आता शासनाचा प्रतिनिधी झाल्यामुळे पूर्वीच्या भूमिकेत बदल होईल असे आपल्याला वाटते का या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, अजिबात नाही़ सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे़ सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे़ म्हणूनच व्यापाऱ्यांनी संप चालू केल्यानंतर मंत्री असूनही मुंबईमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला विकण्यासाठी मी गेलो़ शेतकरी हिताचा निर्णयखुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे़ शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपल्या मर्जीप्रमाणे फळे व भाजीपाला विक्री करता आली पाहिजे म्हणून बाजार समितीच्या नियंत्रणावरून फळे, भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी गैरसमजातून बंद पुकारला होता़ त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय देण्यात आला आहे़ यावर मार्ग काढण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ६ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याच्या सुचना कमिटीस देण्यात आल्या असून शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगार यांच्या हिताचाच निर्णय होईल असेही पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले़१०० कोटी खर्चुन ९ किटवेअरउजनी धरण शंभर टक्के भरले तरी त्यावरील ताण वरचेवर वाढत आहे़ धरणातून शेतीसाठी वर्षभरात चार वेळा पाणी सोडले जाते़ प्रत्येकवेळी १२ टीएमसी पाणी दिले जाते़ पाण्यासाठी धरणातील ४८ टीएमसी पाणी वापरले जाते़ परंतू वर्षभर जोपासलेली पीके जून - जुलै महिन्यात जळू लागतात़ यावर उपाय म्हणून भिमा नदी व सिना नदीवर सुमारे ९ ठिकाणी किटवेअर बांधले तर यामध्ये ३६ टीएमसी पाणी साठणार आहे़ यासाठी १०० कोटी रूपये खर्च येईल असे सांगिल्यानंतर यासाठी आपण पाठपुरावा करू असे पणन राज्यमंत्री खोत यांनी सांगितले़ खोत यांचे ठिकठिकाणी सत्कारमाढा तालुका दौऱ्यात म्हैसगांव, रिधोरे, तांदुळवाडी, कुर्डूवाडी, कुर्डू, पिंपळनेर, टेंभुर्णी, उजनी टें येथे नुतनमंत्री सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला़योजनांचे हेड मिनीमाईज करणारमी पदभार स्वीकारल्यापासून मिळालेल्या वेळेत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे़ कृषी खात्यात ११५ हेडखाली विविध योजना राबविल्या जात आहेत़ यामध्ये बदल करून ११५ ऐवजी कमीत कमी हेडखाली या योजना राबविण्याचा विचार आहे जेणेकरून कामकाजात सुसुूत्रता येईल व योजना प्रभावीपणे होतील़वाघ यांच्या कुटुंबियांचे सात्वनजि़प़ कृषी सभापती पंडीत वाघ यांचे अपघाती निधन झाल्याचे समजताच मंत्री सदाभाऊ खोत यांनी आढेगांव येथे पंडीत वाघ यांच्या निवासस्थानी जावून वाघ कुटुंबियांचे सात्वंन केले़