शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

मुली, सून, नातवंडे नि:शब्द...

By admin | Updated: February 22, 2015 02:23 IST

सून मेघा पानसरे, नातवंडे कबीर आणि मल्हार यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता...हजारो लोक धीर देत होते, सांत्वन करत होते पण पानसरे कुटुंबीय नि:शब्द होते...

कोल्हापूर : माझ्या बाबांनी कुणाचे काय वाईट केले होते?..अशी दु:खद प्रतिक्रिया देणारी गोविंद पानसरे यांची कन्या मेघा पानसरे-टिक्के, स्मिता सातपुते, सून मेघा पानसरे, नातवंडे कबीर आणि मल्हार यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता...हजारो लोक धीर देत होते, सांत्वन करत होते पण पानसरे कुटुंबीय नि:शब्द होते... दुपारी सव्वा एकच्या दरम्यान अण्णांचे पार्थिव दसरा चौकात आणण्यात आले. व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी शवपेटी उघडताच अण्णांच्या मुली, सून आणि नातवंडांनी हंबरडा फोडला. किती तरी वेळ अण्णांच्या पार्थिवाजवळ बसून एकमेकींच्या गळ््यात पडून रडत होत्या. ...अन् मेघा पानसरे-टिक्की रुग्णालयात परतल्या...पानसरेंवरील उपचारासाठी मुलगी स्मिता सातपुते आणि मेघा पानसरे मुंबईला गेल्या होत्या. लहान मुलगी मेघा पानसरे-टिक्की या आईसोबत अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या. मेघा या आपल्या पित्याच्या अंत्यदर्शनासाठी दसरा चौकात आल्या. मात्र उमा पानसरे मेघा कुठे गेली? अशी विचारणा करत असल्याचे समजल्यानंतर त्या पुन्हा दवाखान्यात परतल्या. पोरकी झाले...अण्णांच्या जाण्याने आज मला खऱ्या अर्थाने पोरकी झाल्यासारखं वाटतंय. माझ्या आयुष्यात जी काही स्थित्यंतरे घडली, त्या सगळ्यांशी लढण्याचे बळ अण्णांनी मला दिले. चळवळीत काम करण्याची ताकद कशी असते, हे मी त्यांच्याकडे बघून शिकले. समाजासाठी ते प्रेरणास्थान होतेच; पण माझाही आधारवड होते. आता मला हे बळ गेल्यासारखं वाटतंय. - मेघा पानसरे, स्नुषालेक होण्याचे भाग्य मिळालेविचाराने आणि तत्त्वाने खूप मोठ्या माणसाची लेक असण्याचे भाग्य मला मिळाले. वडील म्हणून त्यांचा धाक होताच; पण आम्हा भावंडांशी त्यांचे मैत्रीपूर्ण नातेही होते. आपले आचरण आणि विचार हेच सूत्र ठेवून त्यांनी आम्हाला वाढविले. ‘पप्पा गेले’ हे वाक्य ऐकले, तो प्रसंग पचवणे खूप अवघड आहे.- स्मिता सातपुते, मुलगीराज्यभरातील कार्यकर्ते अंत्ययात्रेत भाकपचे राज्य अधिवेशन शनिवारपासून सुरू होणार होते; त्यामुळे भाकपचे राज्यभरातून कार्यकर्ते अधिवेशनासाठी आले होते; परंतु त्यांना आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेतच सहभागी होण्याची दुर्दैवी वेळ आली. अनेक कार्यकर्ते पत्नी व मुलांना घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले.