शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुलींचा जन्मदर कमी होतोय , महिला आयोगाच्या अध्यक्षांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:21 IST

राज्य महिला आयोग हा सर्व महिलांसाठी आहे. त्यामुळे आमच्याकडे अनेक प्रकरणे आहेत, त्यापैकी बरीच सोडविण्यात आली आहेत.

मुंबई : राज्य महिला आयोग हा सर्व महिलांसाठी आहे. त्यामुळे आमच्याकडे अनेक प्रकरणे आहेत, त्यापैकी बरीच सोडविण्यात आली आहेत. समाजातील तळागाळात कार्य सुरू असताना, दुस-या बाजूला मुलींचा जन्मदर वाढत नाही, ही खेदजनक बाब आहे, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केली.राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जाहीर केला. सोनोग्राफी मशिनला अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकर बसविण्यात येणार नाही, असे डॉ. सावंत यांनी ठामपणे सांगितले. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने डॉक्टरांची मते जाणून घेण्यासाठी, नुकतीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोनोग्राफी मशिनमध्ये अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकर बसवू नका, ही आग्रही मागणी डॉक्टरांनी लावून धरली. या नकारासाठी ठोस युक्तिवादही या डॉक्टरांनी केला. काही डॉक्टर्स मात्र, अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकरचे फायदे पटवून देताना दिसले. थोडक्यात, या विषयावर डॉक्टरांमध्ये दोन गट पडलेले दिसून आले.गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक (पीसीपीएनडीटी) आणि एमटीपी या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी हा कळीचा विषय ठरतो आहे. या कायद्यांचे पालन कसोशीने होणे गरजेचे असल्याबाबत मात्र, डॉक्टरांमध्ये एकमत दिसले. अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकरच्या विषयावर विस्ताराने चर्चा झाली खरी, पण अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकरची उपयुक्तता आणि हाताळणी याबाबत मात्र, डॉक्टरांमध्ये मतभिन्नता होती.