ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ६ - घरात एक मुलगी असताना दुस-या खेपेसही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या महिन्याभराच्या चिमुकलीला चुलीत जाळल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. गौरखेडा कुंभी या गावात ही दुर्दैवी घटना घडली असून त्यात त्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
दुसरी मुलगीच झाल्याने निकीत वाकोडे ही महिला नाराज झाली होती. त्यातच अवघ्या महिन्याभरची ही चिमुरडी रडायला लागल्याने रागाच्या भरात निकिताने तिला उचलून घराच्या चुलीमध्ये जाळलं. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर निकीताने मुलीचा मृतदेह एका बॉक्समध्ये टाकून कुंभीनजीकच्या विच्छन नदीपात्राजवळ टाकून दिला. गावातील लोकांनी हा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकरणाचा शोध सुरू झाला आणि घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असता, गरिबीमुळे दोन्ही मुलींचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न पडल्याचे मुलीची हत्या केल्याची कबुली तिने दिली.