शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गिफ्ट मिल्क’मुळे कुपोषणाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 04:12 IST

नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल; शिवाय राज्यात ऐरणीवर असलेला बालकांच्या कुपोषणाचाही प्रश्न सुटेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) पुढाकाराने मदर डेअरी फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल प्रायव्हेट लि़मिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत शनिवारी महापालिके च्या हनुमाननगर येथील लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘गिफ्ट मिल्क’ उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार नागो गाणार आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, राज्यात विशेषत: विदर्भात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे, शिवाय शेतकºयांच्या आत्महत्याही होत आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळतात. ही गंभीर समस्या आहे, या उपक्रमामुळे दुधाला चांगला भाव मिळणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. सोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक दूध मिळणार असल्याने त्यांचे आरोग्य सुदृढ होईल. हा उपक्रम संपूर्ण राज्यासह देशातही सुरू करण्यात आल्यास दूध उत्पादक व बालकांच्या विकासात मोठे परिवर्तन होईल.वाढदिवसाला दूधवाटप करा२७ मे रोजी वाढदिवसानिमित्त भक्ती निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांनाच आपण मदर डेअरीचे दूध दिले. सर्वांनी वाढदिवस व अन्य समारंभात इतर पेय देण्यापेक्षा दूध द्यावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाnewsबातम्या