शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

घोलप, हळवणकरांची आमदारकी धोक्यात

By admin | Updated: July 17, 2014 02:44 IST

न्यायालयाने शिक्षा सुनावलेले शिवसेनेचे देवळाली येथील आमदार बबन घोलप आणि इचलकरंजीचे भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांची आमदारकी धोक्यात आली

मुंबई : न्यायालयाने शिक्षा सुनावलेले शिवसेनेचे देवळाली येथील आमदार बबन घोलप आणि इचलकरंजीचे भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांची आमदारकी धोक्यात आली असून, त्यामुळे त्यांना ९ वर्षे कोणतीही निवडणूक लढता येणार नाही. दोघांचेही सदस्यत्व रद्द करावे, असे मत निवडणूक आयोगाने राज्यपालांना दिल्यामुळे राज्यपाल कुठल्याही क्षणी तसा आदेश काढू शकतात.विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले, की या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील प्रकरण महाधिवक्ता यांचे मत घेऊन विधिमंडळ सचिवालयाने राज्यपालांकडे पाठविले होते. राज्यपालांनी त्यावर निवडणूक आयोगाचे मत मागविले होते. दोघांचे सदस्यत्व घटनेच्या कलम १९१, १९२ नुसार रद्द करावे, असे मत आयोगाने दिले आहे. सदस्यत्व रद्द करण्यासंबंधीचा राज्यपालांचा आदेश येत्या एक-दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देऊन राज्यात सत्तेत येऊ पाहात असलेल्या महायुतीला हा धक्का आहे. दोन्ही काँग्रेसला यानिमित्ताने युतीची कोंडी करण्याची संधी मिळेल. घोलपांचे काय आहे प्रकरण ?सेनेचे आमदार घोलपांवर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने त्यांना तीन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व त्यांना ३ वर्षांची शिक्षा झाल्यापासून म्हणजे २० मार्च २०१४ पासून रद्द केले जाणार आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सहा वर्षे म्हणजे मार्च २०२३ पर्यंत त्यांना निवडणूक लढता येणार नाही.हळवणकरांना वीजचोरी भोवली!हळवणकर यांचा कोरची (ता.हातकणंगले) येथे भागीदारीत यंत्रमाग कारखाना असून, तेथे वीजचोरी केल्याप्रकरणी इचलकरंजीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षे कैदेची शिक्षा ३ मे २०१४ रोजी सुनावली होती. या विरुद्ध त्यांनी केलेले अपील दाखल करून घेताना उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, मात्र त्यांना दोषी ठरविण्याचा निकाल स्थगित केलेला नाही. त्यांनाही २०२३ पर्यंत कोणतीही निवडणूक लढता येणार नाही.