शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर इमारत दुर्घटना : माझे हात कापा, पण मला वाचवा... मृत्यूशी तिनं दिली झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 14:58 IST

घाटकोपर पश्चिमेकडील साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (26 जुलै) संध्याकाळी थांबवण्यात आले. या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेदरम्यान मन सुन्न करणा-या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एक कहाणी आहे प्रज्ञा जडेजा यांची..

घाटकोपर, दि. 27 -  घाटकोपर पश्चिमेकडील साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (26 जुलै) संध्याकाळी थांबवण्यात आले. या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेदरम्यान मन सुन्न करणा-या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एक कहाणी आहे प्रज्ञा जडेजा यांची... ''माझे दोन्ही हात कापून टाका, पण मला या ढिगा-यातून बाहेर काढा'', असे मनात धस्स करणारे वाक्य शोधमोहीमेदरम्यान एनडीआरएफच्या जवानांच्या कानी पडले. हृदय पिळवटून टाकणारा तो आवाज होता 50 वर्षीय प्रज्ञा जडेजा यांचा. ढिगा-याखाली अडकलेल्या प्रज्ञा जडेजा यांना वेदना असह्य  होत होत्या. जीवाच्या आकांताने त्या बचावपथकाला म्हणत होत्या की,'' भाऊ माझे दोन्ही हात कापा, पण मला लवकर बाहेर काढा... नाही तर माझा जीव जाईल''. 

दुर्घटनेतून बचावलेल्या 11 जणांपैकी प्रज्ञा या एक आहेत, ज्यांना साईदर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगा-याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही इमारती मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. या  घटनेत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कॉन्स्टेबल संतोष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप कठीण परिस्थितीत आम्ही ढिगा-याखालील शोधमोहीम केली. प्रज्ञा यांचे दोन्ही हात कोसळलेल्या दोन मोठ्या भिंतींखाली अडकले होते, मात्र आम्ही त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होतो व अथक प्रयत्नांनंतर तो ढिगारा बाजूला काढण्यात आम्हाला यश आले आणि प्रज्ञा यांना आम्ही सुरक्षित बाहेर काढले. याच पद्धतीनं 20 वर्षीय तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून बचावपथकानं तिलाही सुरक्षितरित्या बाहेर काढले. एका अन्य प्रशासकीय कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, ढिगा-याखाली अडकलेली ही तरुणी वेदनेमुळे कण्हत होती. या तरुणीला वाचवताना अक्षरशः आम्ही प्रार्थना करत होतो की ढिगारा बाजूला सारताना मोठे-मोठे खांब तिच्या अंगावर पडू नयेत आणि अशा पद्धतीनं आम्ही तिला ढिगा-याबाहेर काढले.  

इमारत कोसळल्यानंतर तातडीनं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांचं पथक बचावमोहीमेसाठी दाखल झाले.  या दुर्घटनेतून बचावलेल्या राजेश दोशी (वय ५७) यांची कहाणीदेखील डोळ्यात पाणी आणणारी आहे.  ढिगाऱ्याखाली अडकलेले राजेश दोशी (वय ५७) यांनी मुलगा दर्शनला फोन करुन सांगितले की, मी श्वास घेऊ शकतो पण मला जागेवरून हलता येत नाही. ढिगाऱ्याखाली माझा पाय अडकला आहे, असं त्यांनी सांगितले. दर्शननं याबाबत बचावपथकाला माहिती दिली. यानंतर तब्बल 15 तासांनी राजेश यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मंगळवारी घाटकोपरमधील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हते झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.