शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

आत्मसन्मानाच्या लढाईसाठी सज्ज व्हा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 27, 2014 13:16 IST

ही निवडणूक म्हणजे आत्मसन्मानाची लढाई असून त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - महाराष्ट्राच्या व हिंदुत्वाच्या मुळावर जे आले त्यांच्यावर मराठीजनांनी जबरदस्त दणका घातला होता, या इतिहासाची आठवण करून देत ही निवडणूक म्हणजे आत्मसन्मानाची लढाई असून त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले आहे. मराठी जनतेच्या मुळावर उठणा-यांची काय हालत होते, हे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या दम दिला आहे. 
'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शिवरायांची व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत भावनिक जनतेला साद घातली आहे. महाराष्ट्रात शिवरायांनंतर इतिहास घडविण्याचे कार्य शिवसेनाप्रमुखांनी केले. शिवरायांनी पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले, पण संपूर्ण देशात हिंदुत्वाची भगवी पताका फडकवण्याची जिद्द बाळगली ती शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्रानेच. महाराष्ट्रात व देशात हिंदुत्व रुजावे यासाठी शिवसेनाप्रमुखांनी असंख्य घाव झेलले. जुन्या औरंगजेबाप्रमाणे नव्या औरंग्यांना धुळीस मिळवले. त्याचीच फळे आज दिल्ली व महाराष्ट्रात डवरलेली दिसत आहेत. जे जे महाराष्ट्रावर मतलबासाठी चाल करून आले ते याच मातीत गाडले गेले, कायमचे नामशेष झाले, असे सांगत त्यांनी राजकीय पक्षांना इशाराच दिला आहे.  ज्यांनी महाराष्ट्राचा आत्मसन्मान व स्वाभिमान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, त्यांची गत औरंगजेबाच्या थडग्यासारखी झाली. मराठी जनतेचा नि:पात करण्यासाठी आलेले लोकच धुळीस मिळाले. महाराष्ट्राने राष्ट्रहित जपले. राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाची कवचकुंडले कधी वापरली नाहीत असे सांगत जे मर्‍हाटी माणसांच्या हितावर व महाराष्ट्राच्या इज्जतीवर निखारे ठेवणार्‍यांना महाराष्ट्राने त्याच मातीत धुळीस मिळवल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी अग्रलेखातून करून दिली आहे. महाराष्ट्र मर्दांचा आहे आहे असे सांगत हाच मर्दानी बाणा कायम ठेवून, एकजूट होऊन लढाईसाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.