शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा

By admin | Updated: July 20, 2016 00:40 IST

बुद्धिमत्तेला कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड देणे गरजेचे असते.

पुणे : बुद्धिमत्तेला कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड देणे गरजेचे असते. यापुढील प्रगतीचा आलेख चढता ठेवायला हवा. सध्या संशोधनाच्या क्षेत्रात देशात अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाला वैज्ञानिकांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे या क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख यांनी केले.दहावीत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा डी़ एस़ कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी देशमुख बोलत होते. फाउंडेशनचे विश्वस्त श्याम भुर्के, विवेक वेलणकर, अ‍ॅड. प्रमोद आडकर, मनीष खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका आणि खासगी शाळांमधील ११० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.देशमुख म्हणाले, कष्ट, प्रयत्न आणि अभ्यास हेच यशाचे फलित आहे. दहावीच्या पुढील अभ्यासाची काठिण्यपातळी वाढते आहे. अशा वेळी स्वयंअध्ययन, अभ्यासाची पक्की बैठक आणि समज, तुलनात्मक अभ्यास या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, असेही ते म्हणाले.विवेक वेलणकर म्हणाले, बरेचदा परिस्थितीचा बाऊ केला जातो. तसे न करता, परिस्थितीवर मात करून यश मिळवणे आवश्यक असते. यशाच्या मागे न धावता स्वत:मधील क्षमतांचा अत्युच्च विकास साधल्यास यश आपोआप मिळते. यापुढील कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर व्यवहारज्ञान आत्मसात करणे, घोकमपट्टी न करता विषयाचा पाया समजून घेणे, अर्थपूर्ण ज्ञानार्जन अत्यंत गरजेचे आहे. पाया डळमळीत राहिला तर इमारत कशी उभी राहणार, असा सवाल करत, प्रत्येकाने आपली आवड नेमकेपणाने जाणून घेणे आवश्यक आहे. आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास यश मिळते आणि समाधानही. त्यामुळे क्षमतांचे क्षितिज विस्तारणे गरजेचे आहे. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)>या वेळी अ. ल. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेची माहिती दिली. केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारी ही योजना पुणे, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नई या शहरांमध्ये उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी लागणारी पात्रता, स्पर्धा परीक्षा, त्यातून मिळणारी संशोधनाची संधी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.