शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ग्रीन बिल्डिंगसाठी घ्या पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:53 IST

प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून सामाजिक संस्थांच्या मदतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.

- पद्मजा जांगडेप्रदूषण नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून सामाजिक संस्थांच्या मदतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील अनेक महापालिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिकेने घनकचरामुक्त सोसायटी (झीरो गार्बेज सोसायटी) ही संकल्पना राबवली आहे तर ठाणे महापालिकेने ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना अमलात आणण्याचे निश्चित केले आहे.सोसायटी जितकी मोठी तितका खर्च अधिक. पाणी, घनकचरा, वीजपुरवठ्याबरोबरच उद्यान, कॉमन स्पेस आदी ठिकाणच्या देखभाल दुरुस्तीवर नेहमीच हजारो-लाखो रुपये खर्च होतात. याशिवाय तीन चार वर्षांतून एकदा रंगरंगोटी, लिकेज आदींवरही खर्च होतोच. हा खर्च कमी करायचा अथवा नियंत्रणात आणायचा असल्यास तुमची बिल्डिंग ग्रीन सोसायटी करा, असा सल्ला सध्या ठाणे महापालिकेकडून देण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारीही महापालिकेने दर्शवली आहे.साधारण २००१ पासून इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलिंगकडून ग्रीन बिल्डिंगसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. पाण्याचा कमीतकमी वापर, ऊर्जाबचत, नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर, कचरामुक्त परिसर आणि आरोग्यवर्धक वातावरण असलेल्या सोसायटीचा ग्रीन बिल्डिंगमध्ये समावेश होऊ शकतो.प्रदूषणावर मात करण्यासाठी अनेक सोसायट्या इको फ्रेंडली इमारतींसाठी पुढाकार घेत असल्या तरी नेमकी सुरुवात कशी करावी, त्यासाठी आवश्यक उपाय याबाबत अनभिज्ञता असते. महाराष्टÑ ऊर्जा विकास संस्था (मेडा) आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीने ग्रीन बिल्डिंगबाबत मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पुस्तिकेत सरकारी योजना, वीज बचतीसाठी आवश्यक उपाय, सौर यंत्रासाठी अनुदान, त्याचे फायदे, तांत्रिक बाबींबरोबरच सौर पॅनलचा पुरवठा करणाºया सरकारी संस्था/ वेबसाईटची माहिती त्यात नमूद करण्यात आली आहे.ठाणे महापालिकेकडून घोडबंदर परिसरातील दोन सोसायट्यांमध्ये एनर्जी आॅडिटही करण्यात येणार असून उर्जेच्या वापराबाबत योग्य माहिती देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाºया या उपक्रमातून ऊर्जाबचतीत नेमक्या उपाययोजनांची माहिती देण्यात येईल.ग्रीन बिल्डिंगसाठी ठाणे महापालिकेकडून विकास करात ३ ते ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. याशिवाय ज्या सोसायट्या ग्रीन बिल्डिंगसाठी नवनवीन तंत्र अथवा सौर पॅनल बसविणार आहेत त्यांच्या मालमत्ता करातही सवलत देण्यात येणार आहे. साधारण महिन्याभरात उपक्रमाच्या अंमलबजावणीस सुरूवात होण्याची शक्यता आहे. इच्छुक रहिवाशांना महापालिकेच्या वेबसाईटवरूनही ग्रीन बिल्डिंगबाबतची मार्गदर्शक पुस्तिका डाऊनलोड करता येणार आहे.