शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा युवा फुटबॉलपटूंची प्रशिक्षणासाठी जर्मनवारी

By admin | Updated: August 19, 2015 00:19 IST

सहा वर्षांचा दौरा : कोल्हापूरच्या दोघांचा समावेश

मुंबई : भारतात क्रीडा म्हटले तर सर्वांत आधी डोळ्यांसमोर येते ते क्रिकेट. त्यात स्पोर्टस् करिअर करायचे म्हटले तरीही बहुतेकांचा कल हा क्रिकेटकडे असतो. मात्र, काहीजणांनी क्रिकेटच्याही पलीकडे जाण्याचे धाडस करून स्वत:ची ओळख निर्माण केली. अशाच प्रकारचे फुटबॉल खेळामध्ये करिअर करण्याचे धाडस केलेल्या १५ वर्षांखालील १५ नवोदित खेळाडूंना थेट जर्मनी येथे फुटबॉल प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे आणि तीसुद्धा तब्बल सहा वर्षांसाठी. यू ड्रीम फुटबॉल उपक्रमाअंतर्गत फुटबॉलसाठी देशभरात झालेल्या निवड चाचणी प्रक्रियेतून या अव्वल खेळाडूंना जर्मनवारीची सुवर्णसंधी मिळाली आहे.विशेष म्हणजे या निवडलेल्या अव्वल १५ खेळाडूंपैकी सहा खेळाडू महाराष्ट्राचे असून, यामध्ये कुमार राठोड, इशांत राणा, रॉल लुईस (सर्व मुंबई), प्रणव कणसे, अनिकेत वरेकर (दोघेही, कोल्हापूर) आणि मनीष सिद्धा (पुणे) यांचा समावेश आहे. एकूण ४५ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतून अव्वल ठरलेल्या या १५ खेळाडूंना जर्मनी येथे पुढील सहा वर्षांसाठी अव्वल दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून, या सर्वांचे शिक्षणदेखील जर्मनी येथे सहा वर्षांसाठी सीबीएसई बोर्डाअंतर्गत होईल.या सहा वर्षांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये भारतीय खेळाडूंना जर्मनीतील लोकप्रिय लीग स्पर्धा बुंदेसलिगा स्पर्धेतील ‘टीएसजी १८९९ हॉफेनहेम’ संघाच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार महेश गवळी आणि जॉन केनेथ राज यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणाऱ्या या नवोदित मुलांना जर्मन प्रशिक्षकांकडूनदेखील मार्गदर्शन मिळेल. (क्रीडा प्रतिनिधी)