शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बोर्डीमध्ये पर्यटकांना खुणावतात गावरान फळे

By admin | Updated: May 21, 2016 04:06 IST

बोर्डी आणि परिसरातील गावांमध्ये उन्हाळी मोसमातील फळे बाजारात डेरेदाखल झाली आहेत.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- बोर्डी आणि परिसरातील गावांमध्ये उन्हाळी मोसमातील फळे बाजारात डेरेदाखल झाली आहेत. फळ्बागायतीमधील फळांप्रमाणेच पश्चिम घाटाच्या जंगलातील रानमेवा खास पसंतीला उतरत आहेत. दरवर्षी या हंगामात येणाऱ्या फळांची चव चाखण्यासाठी बोर्र्डीमध्ये येणाऱ्या परगावतील पर्यटकांची संख्याही वाढताना दिसत आहे.डहाणू हा बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. बोर्डी परिसरात विविध फळांच्या बागायती दिसून येतात. चिकू या फळाने घोलवड आणि बोर्डी गावांना जागतिक बाजारपेठेत विशेष ओळख दिली आहे. चिकू फळाप्रमाणेच येथे नारळ, आंबा, लिची, पफणस, सफेद जांभू आदि फळांच्या बागायती आहेत. या पैकी नारळ वगळता अन्य फळे उन्हाळी हंगामात येणारी मोसमी फळे आहेत. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ही फळे बाजारात येत असून, या वर्षीही ही फळे डेरेदाखल झाली आहेत. गेल्या वर्षी लिची प्रती डझन ४० रु. होती. या वर्षी त्यामध्ये १० रु पयांनी वाढ झाली आहे. सफेद जांभूळ २० रु. डझन, आंबा ७० रु. किलो दराने विकले जात असून, घावूक बाजारातील दरात कमी-अधिक प्रमाणात फरक दिसून येतो. सध्या बोर्डी परिसरात मुंबई व इतर परिसरातून पर्यटक वाढत असतांना फळांची विक्री जोर पकडू लागली आहे.या परिसरातून रेल्वेने मुंबई आणि परिसरात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या महिलांमुळे शहरातील खवयांना फळांची चव चाखता येत आहे. मे महिना हा उन्हाळी पर्यटनाचा हंगाम असल्याने डहाणू आणि बोर्र्डी पर्यटनस्थळी भेट देणारे परगावतील पर्यटक या फळांचा यथेच्च आस्वाद घेताना दिसत आहेत. या फळांच्या उपलब्धतेमुळे सर्वच स्तरातील स्थंनिकांना रोजगार संधी निर्माण झाली आहे. एकंदरत इतर ठिंकाणी उन्हाची काहिली असली तरी बार्डीमध्ये हा व्यावसायाचा काळ आहे.येथील पश्चिम घाटाच्या जंगलातून उपलब्ध होणारा रानमेवाही बाजारात आला असून, ताडगोळे ५० रु. डझन, करवंद आणि राजण १० रु. वाटा, तर काळी जांभळे २०० रु. किलोने विकली जात आहेत. डहाणू बोर्डी मार्ग, डहाणू, घोलवड व उंबरगाव रेल्वे स्थानक तसेच स्थानिक आठवडे बाजारात ही फळे विक्र ीसाठी माठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.