शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गौतम यांच्या घोटाळ्याची एसीबी करणार चौकशी, निलंगेकर यांची घोषणा

By यदू जोशी | Updated: July 3, 2019 01:02 IST

अतिरिक्त मुख्य सचिव असलेले विजयकुमार गौतम चार वर्षे संचलनालयाचे संचालक असताना १०० कोटींचे घोटाळे केले, असा चौफेर हल्ला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चढविला.

मुंबई : व्यवसाय प्रशिक्षण संचलनालयात आयएएस अधिकारी विजयकुमार गौतम संचालक असताना घडलेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आणि चौकशीतील चालढकलीचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी एसीबीतर्फे १५ आॅगस्टपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली.एसीबी चौकशी पूर्ण होईपर्यंत आधीच्या चौकशीत दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एसीबीचा अहवाल येणार आहे, तेव्हा विधिमंडळ अधिवेशन सुरू नसेल. त्यामुळे चौकशीबाबत सदस्यांना माहिती मिळावी, यासाठी आपल्या दालनात बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती नीलम गो-हे यांनी सरकारला दिले.

अतिरिक्त मुख्य सचिव असलेले विजयकुमार गौतम चार वर्षे संचलनालयाचे संचालक असताना १०० कोटींचे घोटाळे केले, असा चौफेर हल्ला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चढविला. नागो गाणार, प्रा.अनिल सोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. गिरीश व्यास, भाई जगताप यांनी २०११ ते २०१४ दरम्यानच्या या घोटाळ्याची चौकशी का दाबली जात आहे, गौतम यांना कोण वाचवू पाहत आहे, असा सवाल केला. त्यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचा उल्लेख करून, एसीबी चौकशीची मागणी केली.

आयटीआयसाठी केलेल्या खरेदीत १०० कोटी रुपयांचे घोटाळे गौतम आणि अन्य अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर चौकशीचा फार्स केला, पण अहवालच आलेला नाही. खात्याचे सचिव असीम गुप्ता, मंत्र्यांचे खासगी सचिव मारूती मोरे, प्रभारी संचालक अनिल जाधव, सध्याचे उपसंचालक योगेश पाटील यांनी चौकशी दाबली, असा आरोप गाणार यांनी केला.गौतम यांच्याकडे आॅनलाइन शेतकरी कर्जमाफीचे काम आयटी सचिव म्हणून सोपविले होते. त्याचा बट्टयाबोळ त्यांनीच केला. ते नगरविकास विभागात असताना त्यांनी बरीच उलटी कामे केली होती असा आरोप गिरीश व्यास यांनी केला. गौतम यांचा खरा चेहरा १०० कोटींच्या घोटाळ्याने समोर आला असा चिमटा अनिल सोले यांनी काढला.

चौकशी पूर्ण होऊ नये यासाठी खात्यातील अधिकाºयांनी षड्यंत्र केले. सभागृह व सरकारची वारंवार दिशाभूल केली. पहिले प्रकरण दाबण्यात यशस्वी झाल्यानंतर २०१७-१८ मध्ये गरज नसताना ५० कोटींची खरेदी केली. त्यातही दहा कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गाणार यांनी केला. प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने एसीबी चौकशीची मागणीही त्यांनी केली.‘दोषींवर कठोेर कारवाई करणार’मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले की, २०११ ते १४ च्या भ्रष्टाचाराची चौकशी एसीबीकडे सोपविण्यात येईल. त्यात दोषी अधिकाºयांवर कठोेर कारवाई केली जाईल. आधीच्या चौकशीत ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांच्यावर एसीबीचा तपास पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तर, २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ५० कोटीच्या खरेदीप्रकरणाची अद्याप चौकशी झाली नाही. परंतु दोन्ही प्रकरणात तीच मंडळी असल्याचे दोन्हींचा तपास एकत्रितपणे एसीबीकडे सोपविण्यात येईल. याशिवाय, योगेश पाटील यांच्या पदोन्नतीची शिफारस करणाºयांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा