संजय हिरे - खेडगाव (जळगाव)इंचभर जमिनीसाठी होणारी भांडणे; गावठाण, गावरान, गावकीच्या मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण, त्यातून होणारे वाद, यावर बात्सर येथील ग्रामस्थांनी थोडीथोकडी नव्हे, तर पाच एकर जमिनीवर एक हजार वृक्षांची आमराई उभी केली आहे.बात्सरचे ग्रामस्थ केवळ आंब्याच्या झाडांची लागवडच करून थांबले नाहीत, तर ते त्यांची देखभाल, संवर्धनाकडे जातीने लक्ष देत आहेत. गिरणा खोऱ्यातील भडगाव तालुक्यातील बात्सर म्हणजे शंभर घरांचे छोटेसे गाव आहे. १९२५ च्या जलप्रलयानंतर हे गाव नदीकाठापासून दीड कि.मी.वर वसले. परिसर विकासासाठी जागेची अडचण होती. गाव उठलेल्या जागेवर केळी बाग, म्हशी पालन करणाऱ्यांची घरे होती. गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अतिक्रमणधारकांना जागा मोकळी करण्याची विनंती केली आणि मोकळ््या झालेल्या जागेवर वृक्ष लागवडीचा संकल्प केला.
गावठाणावर आमराई!
By admin | Updated: December 28, 2014 01:30 IST