शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी नवे कायदे आणणार, राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:07 IST

भारत जोडो पदयात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा..

जयदेव वानखडे -

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : आदिवासींचे पर्यावरणाशी अतिशय जुने नाते आहे. त्यांची भाषा जगण्याची पद्धत वेगळी असली तरी इतरांपेक्षा कमी नाही. यूपीए सरकारने आदिवासींना वन जमिनीचा अधिकार दिला तो त्यांचा हक्क आहे, आमचे सरकार आल्यावर त्यांच्यासाठीचे कायदे दुपटीने मजबूत करून  आदिवासींसाठी नवे कायदे आणणार असल्याचे आश्वासन प्रतिपादन खासदार राहुल गांधी यांनी दिले. भारत जोडो पदयात्रा रविवारी जळगाव जामोद येथे पाेहाेचली़  यावेळी  येथे लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा घेण्यात आला. महिला मेळाव्याला संबाेधित करताना त्यांनी महिलांना ३० टक्के आरक्षण दिले असून, मनरेगाच्या माध्यमातून कामाची हमी दिली असल्याचे सांगितले. भारत जोडो यात्रेचे लक्ष देश जोडणे आहे, हिंसा अन्याय याविरुद्ध लढण्यासाठी आम्ही निघालो आहोत. सध्या देशात महिला असुरक्षित आहेत. जो देश महिलांचा सन्मान करत नाही तो पुढे जाऊ शकत नाही. बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत़  महिला जातीचा अपमान हाेताना दिसत असल्याची त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘आमच्यासाठी तुम्ही आदिवासी...’ माझी आजी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी मी लहान असताना मला एक पुस्तक वाचायला दिले त्याचे नाव होते ‘तेंदू एक आदिवासी बच्चा’.

ते पुस्तक मला खूप आवडायचे़  मी माझ्या आजीकडून ते ऐकायचो.  मोठा झाल्यावर मला एका प्रदर्शनामध्ये ते पुस्तक पाहायला मिळाले . या भारत भूमीवर पहिला अधिकार आदिवासींचा आहे. तेच जंगलाचे मालक आहेत. परंतु त्यांना वनवासी संबाेधले जात आहे. 

कोणताही वनवासी शहरात राहून डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकणार नाही का? असा प्रश्न उपस्थित करत आमच्यासाठी तुम्ही वनवासी नाही तर आदिवासीच आहात असा विश्वासही राहुल गांधी यांनी या आदिवासी मेळाव्यातून दिला. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या जिलाबाई वसावा, बेनुबाई पाडवी, नंदा पावरा, यशोमती ठाकूर, डॉ. स्वाती वाकेकर, अंजली टापरे, ज्योती ढोकणे, हेमप्रभादेवी, प्रेमलता सोनोने मंचावर उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राWomenमहिला