शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

क्या बात! कचरावेचक मुलांनी घेतला पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 18:06 IST

कचरावेचक मुलं केवळ झाडं लावून थांबली नाहीत तर त्यांनी ही झाडं दत्तक घेत त्यांच्या सुयोग्य संगोपनाचीही काळजी घेत आहेत.

झाडं दत्तक घेत केला पर्यावरण रक्षणाचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण:  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अनेकांनी वृक्षरोपण करत त्यासोबत सेल्फी काढले. त्यापैकी काही रोपट्यांची आताची परिस्थिती काय आहे? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू  शकेल. कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वेचणारे हात आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे ही कचरावेचक मुलं केवळ झाडं लावून थांबली नाहीत तर त्यांनी ही झाडं दत्तक घेत त्यांच्या सुयोग्य संगोपनाचीही काळजी घेत आहेत. कल्याणातील पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मूलांनी आपल्या परिसरात अनेकविध झाडं लावून त्यांचं रक्षण करण्याचीही जबाबदारी घेतली आहे.

अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी आवळा, चिंच, जाम, पेरू, कडुलिंब, लिंबू, सिताफळ आदी प्रकारची झाडं लावली. केवळ झाडं लावून ही मुलं थांबली नाहीत, तर ती जगण्यासाठी या झाडांचे पालकत्वही या मुलांनी घेतले आहे.  आणि ही जबाबदारी ही मुलं अत्यंत योग्य पध्दतीने पार पाडत असून गेल्या 3 आठवड्यांमध्ये ही झाडं हळूहळू बारसं धरू लागल्याचे दिसत आहे. मुलांना लहानपणापासून झाडं आणि निसर्गाबाबत गोडी लागण्यासह त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे भानही जागृत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी सांगितले. चिमुकल्यांनी केलेला हा उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श असून केवळ झाडं लावून फोटोसेशन न करता  त्यांचं संगोपनही  वेळेनुसार केलं पाहिजे हा संदेश या मुलांनी दिलाय. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण