शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

राज्यात गारठा; मुंबईचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 7:00 AM

ब्रह्मपुरी @ ८.७ : मध्य महाराष्टÑ, मराठवाड्यात पडणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : मुंबईसह राज्याचे वातावरण ढवळून निघत आहे. कधी पाऊस, कधी मळभ तर कधी थंडी; अशा तिहेरी बदलाचे वारे वाहत आहेत. त्यात आता हवामान खात्याने राज्याला पावसाचा इशारा दिला असतानाच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या किमान तापमानात घट झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १८ तर ब्रह्मपुरी येथील किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असतानाच दुसरीकडे २९ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे ८.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

कोकण, गोवा आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत होते. शिवाय प्रदूषणातही सातत्याने भर पडत होती. शुक्रवारी मुंबईची हवा मध्यम स्वरूपाची नोंदविण्यात आली असतानाच किमान तापमानातही घट झाली. ते २२ अंशावरून १८ अंशावर घसरल्याची नोंद हवामान खात्याने केली.मुंबईत राहणार आकाश ढगाळ२८ आणि २९ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे२८ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२९ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.३० आणि ३१ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.राज्यातील शहरांचे शुक्रवारचेकिमान तापमान (अंश सेल्सिअस)सांताक्रुझ १८डहाणू १६.८पुणे १६.८जळगाव १२महाबळेश्वर १४.९मालेगाव १४.२नाशिक १४.२उस्मानाबाद १५औरंगाबाद १४परभणी १७.९नांदेड १४बीड १८अकोला १४.८अमरावती १२.६बुलडाणा १२.५ब्रह्मपुरी ८.७चंद्रपूर १०.६गोंदिया १०.५नागपूर १२.६वाशिम १६.२वर्धा १३.४यवतमाळ १४

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMumbaiमुंबई