शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानोबा माऊलीला पुणो जिल्ह्याचा भावपूर्ण निरोप

By admin | Updated: June 27, 2014 22:39 IST

आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मीकींच्या वाल्हे नगरीचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

नीरा :  आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मीकींच्या वाल्हे नगरीचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथे पोहोचला. सोहळ्याचे पिंपरे खुर्द ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. माऊलींच्या दर्शनासाठी आणि वारक:यांना न्याहरी देण्यासाठी पिंपरे खुर्दमधील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील झुणका-भाकर व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटणी अशी न्याहरीची शिदोरी घेऊन हे भाविक माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. अध्र्या तासाच्या विश्रंतीनंतर पालखी सोहळा दुपारचे भोजन व विश्रंतीसाठी नीरा नगरीकडे मार्गस्थ झाला.
नीरा नगरीत भव्य स्वागत
नीरा नगरीमध्ये पालखी सोहळ्याने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. पालखी सोहळ्याचे स्वागत पुणो जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती दत्ताजीराव चव्हाण, महिला व बालकल्याण समितीचे माजी सभापती रेखा चव्हाण, सरपंच राजेश काकडे, उपसरपंच वैशाली बंडगर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मुकुंद ननवरे, ज्युबिलंट कंपनीचे उपाध्यक्ष अमित गुप्ता, सरव्यवस्थापक सूर्यकिरण वाकचौरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंदरराव धायगुडे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण आदी विविध पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थांनी केले.
नीरा नदीकिनारी असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी पालखी तळावर हा सोहळा सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोहोचला. 
या वेळी नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऊन, वारा यांच्या खेळात माऊलींच्या दर्शनाचा भाविकांचा उत्साह फारच होता.
नीरास्नानाचा भक्तिपूर्ण सोहळा
 नीरा भींवरा पडता दृष्टी!
स्नान करिता शुद्ध सृष्टी!
अंती तो वैकुंठ प्राप्ती!
ऐसे परमेष्ठी बोलिला!!
पालखी सोहळ्यात इंद्रायणी, नीरा, चंद्रभागा तीरावरील स्नानाला अधिक महत्त्व आहे. 
माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असताना माऊलींच्या पादुकांना इंद्रायणीच्या पवित्र तीर्थाचे स्नान घातले जाते. त्यानंतर पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा नीरा येथे पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्हा हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी नीरा नदीच्या पवित्र तीर्थात निसर्गरम्य दत्तघाटावर स्नान घातले जाते. पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यानंतर माऊलींच्या पादुका स्नानासाठी चंद्रभागा नदीवर नेल्या जातात.
दुपारचे भोजन आणि विसावा उरकल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा सोहळा नीरास्नानासाठी मार्गस्थ झाला. 
पुणो जिल्ह्याचा माऊलींना भावपूर्ण निरोप
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास नीरा नदीच्या पैलतीरावर पुणो जिल्ह्याच्या सीमेवर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते, पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, भोरचे प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार संजय पाटील, पुणो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, पुरंदरच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जलसंपदा खात्याचे कार्यकारी उपअभियंता दिगंबर डुबल, महावितरणचे कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड, सहायक उपअभियंता चंद्रशेखर महाजन, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी आदी शासकीय अधिकारी आणि पदाधिका:यांनी पुणो जिल्ह्याच्या वतीने सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला.
 
हैबतबाबांची जन्मभूमी 
सातारा जिल्ह्यात प्रवेश
महाराष्ट्रातील शूरवीरांची भूमी असलेल्या तसेच आळंदी ते पंढरपूर हा पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला, त्या हभप श्री हैबतबाबा आरफळकर यांच्या जन्मभूमीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. अत्यंत भक्तिमय उत्साही वातावरणात या सोहळ्याचे पुणो व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीकिनारी पाडेगाव येथे स्वागत करण्यात आले.
 
नीरेत सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वैष्णव भक्तांसाठी नीरा ग्रामपंचायत, ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी आणि कर्मचारी संघटना, व्यापारी असोसिएशन, विविध संस्था, सहकारी बँका-पतसंस्था, सामाजिक संघटना, मेडिकल असोशिएशन व औषधविक्रेते संघटना यांच्या वतीने मिष्टान्नाचे भोजन, फळे, अल्पोपहार देण्यात आले, तर मोफत रुग्ण तपासणी व उपचार करण्यात आले.
 
4माऊलीच्या पादुकांच्या नीरा स्नानाच्यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी 
केली होती.