मुंबई : पाकमोडीया स्ट्रीट गोळीबार प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने छोटा राजन टोळीचे गँगस्टर डी. के. राव व उमेद उर रेहमान यांच्यासह चौघांना निर्दोष मुक्त केले. या दोघांचे निर्दोष मुक्त होणे ही गुन्हे शाखेला चपराक असल्याची चर्चा आहे.१७ मे २००११ रोजी पाकमोडीया स्ट्रीट येथील डॉन दाऊद इब्राहिमच्या घराखाली गोळीबार झाला. या गोळीबारात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रायव्हर आरीफ बैल मारला गेला. इंद्रबहाददूर खत्री आणि सय्यद बिलाल या मारेकऱ्यांच्या चौकशीतून हा हल्ला छोटा राजनच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेने शेख, उमेद, राव, आसीफ, सय्यद यांना अेक करून त्यांच्याविरोधात मोक्कान्वये खटला भरण्यात आला होता.
गँगस्टर राव, उमेद निर्दोष
By admin | Updated: August 15, 2015 00:22 IST