शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पॅरोलवरील गँगस्टर कैद्यांनाही मिळणार बॉडीगार्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 05:44 IST

संरक्षणासाठी सशुल्क बंदोबस्त । उच्च न्यायालयाच्या फटक्यानंतर गृहविभागाला उपरती

- जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गॅँगस्टर पॅरोलच्या(अभिवचन) रजेवर बाहेर आल्यास, आता त्याच्यासोबत पोलीस अंगरक्षक (बॉडीगार्ड) असल्याचे पाहायला मिळेल. त्यांच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेतली जाईल. प्रतिस्पर्धी टोळी किंवा विरोधकाकडून त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, हा पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. अर्थात, त्यासाठी त्यांना त्याचे शुल्क आगावू भरावे लागेल.

राज्यात सध्या ९ मध्यवर्ती कारागृहे असून, जिल्हा स्तरावरील अ, ब, क व ड या चार स्तरांवर ४५ अशी एकूण ५४ कारागृहे आहेत. महत्त्वाच्या कारागृहांत डी गँग, छोटा राजन याच्यासह विविध टोळ्यांतील गँगस्टर, गुंड, अतिरेकी विविध गुन्ह्यांतील कैदी शिक्षा भोगत आहेत. तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार त्यांनाही पॅरोल व फर्लोची रजा वरिष्ठांच्या मंजुरीनुसार दिली जाते. या निर्धारित कालावधीत त्यांना जेलबाहेर सोडून निश्चित केलेल्या दिवशी कारागृहात हजर होणे बंधनकारक असते. गंभीर आजार, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना ही सवलत दिली जाते. याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालय, सक्षम प्राधिकरणामार्फत घेतला जातो. रजेच्या कालावधीत कैदी बाहेर आल्यानंतर, विरोधी टोळी किंवा पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या, प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता असते. याबाबत या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

सुनावणीत खंडपीठाने अशा परिस्थितीत पॅरोलवरील संबंधित कैद्याची सविस्तर माहिती घेऊन आवश्यकतेनुसार त्यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, संबंधित कैद्यांना सुरक्षा पुरविताना शुल्क आकारण्याचे धोरण गृहविभागाने नुकतेच निश्चित केले आहे. यासंबंधी गेल्या वर्षी १ एप्रिलला पोलीस सुरक्षा पुरविण्याबाबत निश्चित केलेल्या दराप्रमाणे या कैद्यांकडून बंदोबस्ताचे भाडे घेतले जाईल, असे विभागातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.राज्यातील कारागृहांतील अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात ३५ हजार ७४४ कैदी असल्याचे गृहविभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये ३४ हजार १६२ पुरुष तर १,५८२ महिला कैदी आहेत. त्यापैकी ८५ टक्के कैदी हे न्यायाधीन म्हणजे कच्चे कैदी (अंडर ट्रायल) असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.