शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार

By admin | Updated: April 20, 2016 01:02 IST

नोकरीनिमित्त अमरावतीहून पुण्यात आलेल्या तेवीस वर्षीय तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

पुणे : नोकरीनिमित्त अमरावतीहून पुण्यात आलेल्या तेवीस वर्षीय तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. विकी ऊर्फ विक्रांत सुधीर हिरवे (वय २७, रा. चौधरी पार्क, दिघी गावठाण), मनीष गोविंद राठी (वय ३३, रा. जगजणा आपर्टमेंट, गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), मयूर राजेंद्र कांबळे (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर) आणि निखिल राजेंद्र जाधव (वय २३, रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अमरावती येथील २३ वर्षीय पीडित तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते दि. १८ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची अमरावतीची राहणारी असून, दीड वर्षापूर्वी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सध्या ती एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून नोकरीस आहे. विकीबरोबर चार महिन्यांपूर्वीच तिची ओळख झाली होती. विकी याने रविवारी पीडित तरुणीला जेवायला बाहेर जाऊ, असे फोनवरून सांगितले. त्यानुसार सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही तरुणी विकी व मनीषसह वारजे पुला खालून मोटारीत बसून चांदणी चौकमार्गे वाकडच्या दिशेने गेले. मोटार बावधनच्या जवळ आल्यानंतर विकीने तरुणीवर चालू मोटारीत बलात्कार केला. तिथून मोटार पुढे नेल्यानंतर पिंपळे गुरव या ठिकाणी निखिल मोटारीत बसला. त्यानंतर ते देहू येथे त्यांच्या एका मित्राच्या साखरपुड्याला गेले. या वेळी पीडित तरुणीला मोटारीतच बसवून दरवाजे लॉक करण्यात आले. चार तास तिला मोटारीत कोंंडून ठेवण्यात आले. तिथून सर्व जण रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निघाले असता आणखी एक मित्र मयूर मोटारीत आला. वाटेत ते सर्वजण एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्यानंतर, मद्य प्राशन करून तरुणीलाही जबरदस्तीने मद्य पाजले. विकीच्या दोन मित्रांनी तरुणीवर अत्याचार केले. तरुणीने १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, विकीने मोबाईल हिसकावून घेत तिला धमकावले. मनीषनेही मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर तरुणीला वारजे माळवाडी बसस्थानकाजवळ सोडून दिले.