शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

सामूहिक बलात्कारातील आरोपी गजाआड

By admin | Updated: December 24, 2014 00:50 IST

अपहरण करून एका शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात कळमना पोलिसांना तब्बल २२ दिवसानंतर यश मिळाले. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक

नागपूर : अपहरण करून एका शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात कळमना पोलिसांना तब्बल २२ दिवसानंतर यश मिळाले. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक करून आज त्यांचा पीसीआर मिळवला. मोहम्मद अफरोज जियाउद्दीन पठाण (वय ३४, रा. खरबी पोलीस चौकीमागे, नंदनवन), सुदर्शन ऊर्फ संजू गजानन महेशकर (वय ३७, रा. नवीन इंदोरा, पंजाबी लाईन), अनिल राजू इंगळे (वय ३५, रा. हुडको कॉलनी, नारा), पुंडलिक डोमाजी भोयर (वय ३४, उदयनगर) आणि अश्विन अशोक दानोरे (वय २३, रा. श्यामनगर, हुडकेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. लोकमतमुळे गवसले धागेदोरेया घटनेचा पर्दाफाश लोकमतच्या वृत्ताने होऊन गुन्हा करून दडून बसलेले सर्वच नराधम पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ‘प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करणाऱ्या टोळ्या सक्रिय’, अशा शीर्षकांतर्गतचे वृत्त ४ डिसेंबर रोजी हॅलो नागपूरच्या पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाले होते. वृत्तात अफरोजच्या टोळीचा , कार्यपद्धतीचा आणि आजवर केलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला होता. वृत्त प्रसिद्ध होताच मोठी खळबळ उडून तपास यंत्रणेने अफरोज याच्यासभोवताल तपास केंद्रित केला होता. वृत्तातील अफरोज आणि त्याच्या टोळीतील माणसांना मुंबई येथे अटक करून नागपुरात आणले. या टोळीने असे ५० वर गुन्हे केल्याचे बोलले जात आहे.२२ दिवसानंतर छडापीडित तरुणी (वय २१) एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका आहे. १ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता ती तिच्या मित्रासोबत स्वामीनारायण मंदिरात दर्शनाला गेली होती. दर्शन आटोपल्यानंतर हे दोघे अ‍ॅक्टिव्हाने महामार्गावर फिरायला गेले. विहीरगाव ते धारगाव रस्त्याच्या कडेला एकांतस्थळी ते गप्पा करीत असताना दोन दुचाकींवर पाच जण आले. ‘हम पुलीसवाले है’, असे म्हणत आरोपींनी या दोघांना दमदाटी केली. त्यांना पोलीस ठाण्यात चला, असे सांगून एकाने तरुणाला आपल्या दुचाकीवर बसवले. दुसऱ्या दोघांनी तरुणीच्या अ‍ॅक्टिव्हावर तिला मध्ये बसवले. त्यानंतर हे सर्व कापसी उड्डाण पुलाकडे निघाले. आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण करून तरुणाला मध्येच उतरवून दिले आणि तरुणीला घेऊन हुडकेश्वरकडे पळाले. वेळा गावाजवळच्या एका लेआऊटमध्ये चाकूचा धाक दाखवून या पाच नराधमांनी तरुणीवर पाशवी अत्याचार केला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आरोपींचा शोध घेतला जात होता. नराधमांना ३० पर्यंत पोलीस कोठडीखतरनाक मोहम्मद अफरोज आणि त्याच्या पाच साथीदारांना आज तपास अधिकारी कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एम. बंडीवार यांनी बुरख्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. डी. चक्कर यांच्या न्यायालयात हजर करून ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. आरोपींचे डीएनए प्रोफाईल नमुने प्राप्त करणे आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन, शस्त्र आणि गुन्ह्याच्या वेळचे कपडे जप्त करणे आहे. पीडित शिक्षिकेला हुडकेश्वर भागात सोडून दिल्यानंतर आरोपी कोठे पळून गेले होते, त्याबाबत पडताळणी करणे आहे. आरोपींनी वापरलेले मोबाईल, सीम कार्ड जप्त करणे आहे. आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याबाबत माहिती घेणे आहे, ओळखपरेड घेणे आहे, असे सरकार पक्षाने न्यायालयाला सांगून पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या. प्रकरण गंभीर आहे. महिलांविरुद्ध घडलेला हा अपराध आहे. अशा व्यक्तींच्या कृत्यांमुळे महिला घराबाहेर पडण्याची हिंमत करीत नाहीत, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद करून सर्वच आरोपींना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारला साहाय्य म्हणून विधी अधिकारी शशांक चौबे उपस्थित होते. (प्रतिनिधी)