विरार : विरार पूर्वेकडील मनवेलपाडा रस्त्यावर काही ठिकाणी चक्क रस्त्यावर मंडप टाकून गणपतीचे कारखाने थाटण्यात आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेले कारखाने नवरात्रीच्या आगमनापर्यंत सुरु राहणार असल्याने वाहतुकीला अडथळा ठरणार आहेत. गणपतीचे आगमन होण्यापूर्वी दोन महिने आधीपासून गणपतीचे कारखाने थाटले जातात. त्यासाठी मोठा मंडप टाकून त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तींना रंगकाम करण्याचे काम अहोरात्र सुरु असते. हे कारखाने नवरात्रीपर्यंत चालतात. कारण नवरात्रीसाठी देवीच्या मूर्तीही याठिकाणी तयार केल्या जातात. यंदा विरार पूर्वेकडील रस्त्यावर अनेक कारखाने सुरु झाले आहेत. यातील काही जणांनी तर चक्क रस्त्याचा कोपरा अडवला आहे. (प्रतिनिधी)>अनेकांनी फुटपाथवर मंडप टाकले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूककोंडीला आमंत्रण मिळू लागले आहे. फुटपाथ शिल्लक नसल्याने नागरिकांना चालणे अवघड होऊन बसले आहे.
गणपती कारखाने यंदाही रस्त्यावर
By admin | Updated: August 2, 2016 03:26 IST