शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

गणपती बाप्पा... पुढच्या वर्षी लवकर या ऽऽऽ, विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 04:35 IST

ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत, ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

मुंबई : ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत, ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. अवघी मुंबापुरी गणेशाच्या नामाने दुमदुमून जाणार आहे. ‘निरोप देतो, आम्हा आता आज्ञा असावी...’ असे म्हणत, पाणावलेल्या डोळ्यांनी भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ असे म्हणत आज निरोप देणार आहेत.‘लालबागचा राजा’, ‘गणेशगल्लीचा गणपती’ आणि ‘अंधेरीचा राजा’, ‘गिरगावचा राजा’ची विसर्जन मिरवणूक, मंगळवारी सकाळीच १०च्या सुमारास सुरू होते आणि मग बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी कूच करताना दिसून येतात. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो मुंबईकर गणेशभक्त रस्त्यावर उतरताना दिसतात. मुंबईत सध्या चोहीकडचे वातावरण भक्तिमय झालेले पाहायला मिळत आहे. छोट्या घरगुती गणपतीपासून ‘लालबागचा राजा’ची मोठ्या थाटात विसर्जन मिरवणूक धूमधडाक्यात निघते. लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मिरवणूक मार्गावर भक्तांचा जनसागर उसळतो. लालबागचा राजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येते. अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात येतात, तर ढोल-ताशांच्या आवाजाने आणि भक्तांचा जल्लोषाने वातावरणात गुलालासह भक्तीचाही रंग उधळला जातो.बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीसह अनेक विसर्जन स्थळे तसेच विसर्जन मिरवणुकांनीही जय्यत तयारी केली आहे.बेस्टच्या गाड्यांत कपात-अनंत चतुर्दशीदिवशी मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट मार्ग वळविण्यात येतात. या दिवशी बसगाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याहीकमी असते. परिणामी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बसगाड्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी २.३० नंतर एकूण ३४०७ बसगाड्यांपैकी १६८७ बसगाड्या सुरू राहणार आहेत.विसर्जनादिवशी विशेष ८ लोकल फे-या-गणरायाच्या विसर्जनानिमित्त मध्य रेल्वे ८ विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील. मध्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण/ठाणे आणि कल्याण/ठाणे ते सीएसएमटी अशा प्रत्येकी २ लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी मार्गावर प्रत्येकी २ फे-या होणार आहेत.अनंत चतुर्दशीच्या मध्यरात्री १.३० वाजता सुटणारी लोकल कल्याणला मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. दुसरी लोकल सीएसटीएमहून मध्यरात्री २.३० वाजता सुटेल. कल्याणहून मध्यरात्री १ वाजता सुटणारी लोकल सीएसएमटीला मध्यरात्री २.३० वाजता पोहोचणार आहे. ठाणे येथून २ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला मध्यरात्री ३ वाजता पोहोचणार आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन