शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

By admin | Updated: April 27, 2016 06:27 IST

एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे.

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रीदवाक्य असणारे एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यात एसटीच्या बस गाड्यांना आग लागल्याचा पाच घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित बस असलेल्या टाटा कंपनीकडून अहवाल मागितला आहे. सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मुरुड-मुंबई बसने चिंचवण येथे पेट घेतल्याची घटना घडली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली आणि त्वरीत ५४ प्रवाशांना उतरविले. इंजिनमधील शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. ही घटना घडण्यापूर्वी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या चार घटना घडल्या आणि सोमवारी घडलेली ही पाचवी घटना आहे. वाडा त्यानंतर ठाणे शहर, मराठवाड्यात भूम येथे, खंडाळा घाटात आणि आता चिंचवण येथे एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनेत बसमध्ये प्रवासी होते आणि चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की,घडलेल्या पाच घटनांमध्ये तीन सेमी लक्झरी आणि दोन साध्या बसचा समावेश आहे. या सर्व बसची बॉडी एसटी महामंडळाकडून बांधण्यात आली आहे. मात्र बसमधील इंजिन आणि अन्य इलेक्ट्रीकल कामे टाटा कंपनीची आहेत. त्यांच्याकडूनच होणाऱ्या कामांत काही चुका होत आहेत की अन्य काही कारणे आहेत याची माहीती एसटी महामंडळाकडून घेतली जात >सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. टाटा कंपनीला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे आणि त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी अहवाल सादर करताच पुढील निर्णय घेण्यात येईल.- दिवाकर रावते (परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)