शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगरवासीयांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: January 16, 2017 02:54 IST

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधून रोज रात्री कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधून रोज रात्री कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे. रसायनांच्या असह्य दुर्गंधीमुळे जुईनगरमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुलांना खोकल्याचा व श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही कोणीच दखल घेत नसल्याने जुईनगरवासीयांसाठी रोजची रात्र वैऱ्याची ठरत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये घणसोली ते शिरवणे दरम्यान मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमधील दूषित पाणी कोपरखैरणेमधील प्रक्रिया केंद्रामध्ये सोडणे बंधनकारक आहे. प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी खाडीत सोडणे अपेक्षित आहे. तुर्भे ते शिरवणेमधील कारखान्यांमधील पाणी सानपाडाजवळील साठवणी टाकीत आणले जाते. येथून पंपिंग करून ते कोपरखैरणेमध्ये सोडण्यात येते; पण नियमाप्रमाणे दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता रोज सूर्यास्तानंतर ते जुईनगरच्या नाल्यात सोडण्यात येत आहे. रात्री ८ नंतर जुईनगर रेल्वे स्टेशन समोरच्या पुलावर नाकावर रूमाल ठेवल्याशिवाय उभेही राहता येत नाही. या केमिकलचा वास मिलेनियम टॉवरपासून पूर्ण जुईनगर परिसरात पसरू लागला आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. लहान मुलांना खोकल्याचा प्रचंड त्रास होत आहे. वारंवार खोकला होत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय घशाचे विकार होऊ लागले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याविषयी तक्रार केली आहे; पण काहीही कारवाई केली जात नाही. अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. जुईनगर नाल्यात रसायनमिश्रित पाणी येते कोठून? याविषयी माहिती घेण्यासाठी दक्ष नागरिकांनी जुईनगरपासून नाल्यातून एमआयडीसीपर्यंत प्रवास केला. या वेळी धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. सानपाडाजवळील पंप हाऊसपासून नाल्यात रसायनमिश्रित पाणी येत असल्याचे लक्षात आले. येथील पंपहाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी येथील पाणी नाल्यात सोडले जात नाही. आम्ही ते पंपिंग करून कोपरखैरणेमधील प्रकल्पात सोडत असल्याचे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात नाल्यात जाऊन पाहणी केली असता पंपिंग हाऊसमधील तलावातूनच पाणी नाल्यात जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्यामध्ये सर्वत्र केमिकलचा थर साचला आहे. मध्यरात्रीनंतर केमिकलचे पाणी सोडणे बंद केले जाते. जुईनगरमधील हजारो रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. >सूर्यास्ताचीच भीती वाटू लागलीजुईनगरमधील रहिवाशांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्हाला सूर्यास्ताची भीतीच वाटू लागली आहे. रात्री झाली की नाल्यात केमिकलचे पाणी सोडले जाते. प्रचंड दुर्गंधीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. जुईनगर रेल्वेस्टेशन ते घरापर्यंत जातानाही नाकावर रूमाल ठेवावा लागत आहे. रोजच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे व खोकल्याचे अजार होत आहेत. रात्रीस सुरू असलेल्या या खेळाची भीती वाटत असून हा त्रास थांबवावा, अशी मागणी केली आहे.>जुईनगर नाल्यात रसायनमिश्रित पाणी सोडल्याने प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही कारवाई होत नाही. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. - विजय साळे,वार्ड अध्यक्ष राष्ट्रवादी >जुईनगरमधील नाल्यात वर्षानुवर्षे केमिकल मिश्रित पाणी सोडले जात आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त आहेत. तक्रारी करूनही कोणीच दखल घेत नसून अजून किती वर्षे हा त्रास सहन करायचा. - शशांक शेवतेवैभव सोसायटी>जुईनगरमध्ये आम्ही १७ वर्षांपूर्वी राहण्यास आलो. तेव्हापासून केमिकलच्या दुर्गंधीचा त्रास सुरू आहे. रहिवाशांना श्वसनाशी संबंधित अजार होत आहेत. याविषयी आम्ही अनेक तक्रारी केल्या; पण प्रशासन दखल घेत नाही. - शीला जाधवमहालक्ष्मी सोसायटी >५ ते ६ वर्षांपासून आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत; परंतु प्रदूषण नियंत्रण व शासन काहीही कारवाई करत नाहीत. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना त्रास होत असून संबंधित कंपन्यांवर शासनाने कडक कारवाई करावी.- सागर लकेरीओंकार सोसायटी >१२०० नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जुईनगरमधील राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी विजय साळे यांनी नाल्यातील दुर्गंधीविषयी सह्यांची मोहीम राबविली होती. १२०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने पत्र मिळाल्याचे कळवून कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या; पण प्रत्यक्षात काहीही कारवाई झालेली नाही.