शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

गजराज मथुरेकडे रवाना!

By admin | Updated: June 15, 2017 00:31 IST

गेली अनेक दशके जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या औंध संस्थानचा गजराज ऊर्फ मोती हत्ती अखेर बुधवारी मथुरेकडे गेला. तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर

- लोकमत न्यूज नेटवर्क

औंध (जि. सातारा) : गेली अनेक दशके जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या औंध संस्थानचा गजराज ऊर्फ मोती हत्ती अखेर बुधवारी मथुरेकडे गेला. तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर काहिशा अनिच्छेनेच जड पावलांनी हत्ती ट्रकमध्ये बसला आणि औंधवासीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेतर्फे गजराजाला नेण्यासाठी मथुरा येथील एलिफंट केअर सेंटरची सर्व यंत्रणा सकाळी औंधमध्ये दाखल झाली. मात्र, हत्तीच्या हट्टामुळे तब्बल दहा तासांनंतर त्याला घेऊन जाणाऱ्या टीमने औंध सोडले. वन खाते, महसूल व पोलीस प्रशासन सकाळी सात वाजता औंधमध्ये हजर झाले होते. हत्तीला नेणार असल्याचे समजताच ग्रामस्थ, अबालवृद्ध यांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजवाडा परिसरात गर्दी केली. औंध ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करत प्रशासनाने संपूर्ण गावातून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी हत्तीची मिरवणूक काढली. ही निरोपाची मिरवणूक असल्याने महिला अक्षरश: धाय मोकलून रडत होत्या. अधिकारीही भावनाविवश झाले होते. हत्तीला नेण्यासाठी आलेली मथुरा केअर सेंटरची गाडी औंधपासून दीड कि.मी. अंतरावर थांबविण्यात आली होती. हत्ती सकाळी साडेअकराला तिथे जाण्यासाठी आला खरा पण; तब्बल तीन तास झाले तरी तो गाडीत चढलाच नाही. त्यामुळे सकाळी सातपासून प्रशासन अक्षरश: हतबल झाले होते. एरवी हत्ती कोठेही जाताना काही मिनिटांतच गाडीत बसत होता. परंतु निरोपाच्या वेळी माहुतसह सर्वांनीच हात टेकले. त्यानंतर त्याला सरकारी मळयात नेले परंतु तेथेही तो गाडीत बसत नाही म्हटल्यावर मोकळ्या ट्रकमध्ये बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्ती त्या ट्रकमध्ये बसताच प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.हत्तीकडून श्री यमाई देवीला सलामी !हत्ती ग्रामनिवासींनी मंदिराजवळ आल्यानंतर त्याने आपल्या सोंडेने श्री यमाई देवीस सलामी देताच उपस्थित औंधकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर गजराजने राजवाड्यात जावून सलामी दिली.सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या लग्नाच्या वराती या मोती हत्तीवरुनच निघाल्या आहेत. परिसरातील यात्रा, जत्रांसह अनेक विजयी मिरवणुकाही याच गजराच्या साक्षीने निघाल्या आहेत.