शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

गजानन पाटीलचा जामीन नामंजूर

By admin | Updated: May 19, 2016 05:04 IST

३० कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गजानन पाटील याचा बुधवारी विशेष एसीबी न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.

मुंबई : एका संस्थेशी संबंधित जमिनीच्या व्यवहारासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गजानन पाटील याचा बुधवारी विशेष एसीबी न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा निकटवर्तीय असलेल्या गजानन पाटील याला मंगळवारी विशेष एसीबी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास गेले आठ ते नऊ महिने सुरू आहे. तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले असून खोट्या केसमध्ये अडकवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अटक करण्यात आले नाही, असा दावा पाटील याने कोर्टात अर्जाद्वारे केला. यावर सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी आक्षेप घेतला. ‘गजानन पाटील याने तपास यंत्रणेला सहकार्य केले नाही. त्यामुळे तपास यंत्रणेला प्रगती साधता आली नाही. पाटीलविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. तपास यंत्रणा त्याच्या मागावरच होती. जेव्हा त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे हाती लागले आणि प्रकरण गंभीर असल्याचे जाणवले तेव्हा तपास यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. पुराव्यांची पडताळणी पाटीलकडे करण्याची गरज भासेल. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका करू नये,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. देसाई यांनी केला. सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष एसीबी न्यायालयाने गजानन पाटीलची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)