शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गहुंजे-साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली

By admin | Updated: July 4, 2016 02:09 IST

गेल्या तीन दिवसांपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ

किवळे : गेल्या तीन दिवसांपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रविवारी दुपारपासून गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने रविवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना नऊ-दहा किलोमीटरचा वळसा घालून घरी जावे लागले. साकव पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारपासून गहुंजे, मामुर्डी , रावेत, देहूरोड, किवळे , विकासनगर आदी भागांतील विद्यार्थ्यांना साळुंब्रेतील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात येण्या-जाण्यासाठी सोमाटणे फाटामार्गे नऊ -दहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. साळुंब्रे गावातून देहूरोड, पिंपरी -चिंचवड परिसरात शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, तसेच पिंपरी , भोसरी व चाकण औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, देहूरोड , पिंपरी , चिंचवड व आकुर्डी भाजी मंडई येथे तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, रावेत व विकासनगर येथे दूध घेऊन येणारे दूध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालून ये - जा करावी लागणार आहे. (वार्ताहर) >उंच पुलाअभावी होतेय गैरसोय दर वर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने स्थानिकांसह पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार व विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, शासन उदासीन असल्याची तक्रार . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक त्रस्त . पावसाळ्याचे तीन-चार महिने जिकिरीचे , शेतीमाल व दूध व्यवसायात मोठे नुकसान . कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची कामगारवर्गाची मागणी .