शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर नेणार, गडकरी अन् मुख्यमंत्र्यांची ग्वाही ; दोन वर्षांत देणार ६० हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:59 IST

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी येत्या दोन वर्षांत ५५ ते ६० हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाईल आणि सध्या २२ टक्के असलेले सिंचन क्षेत्र राज्याच्या मदतीने दोन वर्षांत ४० टक्क्यांवर नेले जाईल

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी येत्या दोन वर्षांत ५५ ते ६० हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाईल आणि सध्या २२ टक्के असलेले सिंचन क्षेत्र राज्याच्या मदतीने दोन वर्षांत ४० टक्क्यांवर नेले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय जलसंपदा व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रपरिषदेत दिली.सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक गडकरींच्या मुख्य उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. जलसंपदा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील प्रकल्पांसाठी घेतलेल्या या पहिल्याच बैठकीत गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन वर्षांत सिंचन आणि रस्त्यांबाबत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प केला.

गडकरी म्हणाले की, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्राकडून एक हजार कोटी तत्काळ दिले जातील. एकूण २५ हजार कोटी केंद्र देईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या कर्जाचा हिस्सा १५ दिवसांत मिळेल. अवर्षणप्रवण आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांसाठी राज्याने मागणी केलेले १०,५०० कोटी देण्यासंदर्भात वित्त मंत्री अरुण जेटली यांच्यासोबत बैठक घेऊ. शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, इतक्या सिंचन सुविधा निर्माण केल्या जातील. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.नदीजोड प्रकल्पाचाश्रीगणेशा महाराष्ट्रातूनमहाराष्ट्र आणि गुजरात सरकारच्या संयुक्त सहकार्यातून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प उभारण्याचे काम येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येईल आणि हा देशातील पहिलाच नदीजोड प्रकल्प असेल, अशी ग्वाही गडकरी व फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात १२ वा १३ सप्टेंबरला फडणवीस व गुजरातचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारशी करार होणार आहे.खड्डे ३१ डिसेंबरपर्यंतबुजविणार : पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे येत्या डिसेंबरपर्यंत बुजवावेत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विभागाच्या अधिकाºयांना बैठकीत दिले. खड्डे बुजविण्याच्या निविदांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर ते काम स्वत: बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.याशिवाय, तापीच्या एका खोºयातील पाणी दुसºया (गोदावरी) खोºयात नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच पार-तापी नदीजोड प्रकल्पही हाती घेण्यात येणार असून दोन्ही प्रकल्पांवर २० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.घोटाळ्यांची चौकशी वेगानेच : फडणवीसआघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांच्या चौकशीची गती कुठेही मंदावलेली नाही. आतापर्यंत चार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. एकेक अरोपपत्र ३० हजार पानांचे आहे. त्यामुळे वेळ लागतो. बाकीच्यांची चौकशी पूर्ण होईल, तसतसे आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नात सांगितले.गडकरी अन् मुख्यमंत्र्यांची ग्वाही : दोन वर्षांत देणार ६० हजार कोटी

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस